सांगोल्यात उद्यापासून ‘दुर्गामाता दौड’चा जयघोष! २० ऑक्टोबरला भव्य महादौड
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सांगोला विभागाचे आयोजन; हिंदू संस्कृती, संघटन आणि राष्ट्रभक्तीचा जागर करण्यासाठी नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
सांगोला | प्रतिनिधी सांगोला शहरात नवरात्रोत्सवानिमित्त भक्ती, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचा जागर घडविणाऱ्या ‘दुर्गामाता दौड’ला रविवार, दिनांक ११ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सांगोला विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही दौड २० ऑक्टोबरपर्यंत दररोज सकाळी ६ वाजता शहरातील विविध भागांतून काढण्यात येणार आहे.
या उपक्रमातून हिंदू समाजातील एकता, संघटन, संस्कार आणि राष्ट्रभक्तीची भावना दृढ करण्याचा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला आहे.
दहा दिवस चालणाऱ्या या दौडमध्ये शहरातील विविध मंदिर परिसर, पेठा, गल्ली आणि नगरांमधून सहभागी धावणार आहेत.
रविवार, ११ ऑक्टोबर रोजी शिवतीर्थ येथून दौडला प्रारंभ होईल. हनुमान मंदिर, परित गल्ली आणि मिक्सणूक मार्गावरून ही दौड मार्गक्रमण करेल. त्यानंतर दररोज ठरवून दिलेल्या मार्गांवर दौड आयोजित केली जाणार आहे.
असा असेल दहा दिवसांचा दौड कार्यक्रम
रविवार, ११ ऑक्टोबर : शिवतीर्थ – हनुमान मंदिर – परित गल्ली – मिक्सणूक मार्ग.
सोमवार, १२ ऑक्टोबर : शिवतीर्थ – गोधळ गल्ली – अंबिकादेवी मंदिर – वज्राबाद पेठ – शिवतीर्थ.
मंगळवार, १३ ऑक्टोबर : शिवतीर्थ – गोष्टी गल्ली – भोपळे रोड – स्टेशन रोड – शिवतीर्थ.
बुधवार, १४ ऑक्टोबर : महादेव मंदिर – ध्यान मंदिर – अयोध्या नगरी – महादेव मंदिर.
गुरुवार, १५ ऑक्टोबर : वासुद चौक – शिवाजीनगर – दत्तनगर – गणेशनगर – वासुद चौक.
शुक्रवार, १६ ऑक्टोबर : वासुद चौक – कर्मवीरनगर – वासुद चौक.
शनिवार, १७ ऑक्टोबर : अंबिकादेवी मंदिर – विद्यानगर – यशनगर – साठेनगर – सनगर गल्ली – अंबिकादेवी मंदिर.
रविवार, १८ ऑक्टोबर : अंबिकादेवी मंदिर – पुजारीवाडी – एकतपूर रोड – अंबिकादेवी मंदिर.
सोमवार, १९ ऑक्टोबर : शिवतीर्थ – देशपांडे गल्ली – महादेव गल्ली – शिवतीर्थ.
मंगळवार, २० ऑक्टोबर : भव्य महादौड – शिवतीर्थ – गोधळ गल्ली – अंबिकादेवी मंदिर – कुंभार गल्ली – मिक्सणूक मार्ग – शिवतीर्थ.
भगवा फेटा किंवा पांढरी टोपी परिधान करण्याचे आवाहन
दौडमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांनी डोक्यावर भगवा फेटा किंवा पांढरी टोपी परिधान करून सहभागी व्हावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे. शहरातील युवक,
महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व धर्मप्रेमी नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सांगोला विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या दौडमुळे सांगोला शहरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा असून, २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महादौडीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


0 Comments