शहाजी बापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोल्यात आरोग्य सप्ताहाचे आयोजन; विविध आरोग्य शिबिरांतून नागरिकांना मिळणार उपचारांची सुविधा
नेत्र तपासणीपासून हृदयविकारावरील उपचारांपर्यंत विविध उपक्रम; शिवसेनेचा पुढाकार
सांगोला : आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने सांगोला शहरासह संपूर्ण तालुक्यात ‘आरोग्य सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे.
या सप्ताहाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार असून
, सर्वसामान्य नागरिकांना तपासणी आणि उपचारांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.
या उपक्रमाची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे आणि शहराध्यक्ष सोमेश यावलकर यांनी दिली.
आरोग्य सप्ताहांतर्गत नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, चष्मे वाटप, हृदयविकार व मूत्रविकार तपासणी,
बायपास शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन, स्नायूंचे आजार, हाडांचा ठिसूळपणा यांसह विविध
आरोग्यविषयक तपासण्या करण्यात येणार आहेत. तसेच रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे.
तालुक्याच्या विविध भागांत आरोग्य शिबिरे
सांगोला शहरापुरते मर्यादित न राहता तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटात आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे
. या शिबिरांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध आजारांची तपासणी करून घेण्याची,
तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळविण्याची आणि आवश्यक उपचारांबाबत माहिती घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
वेळीच आजारांचे निदान व्हावे, आरोग्याबाबत जनजागृती वाढावी आणि गरजू रुग्णांना उपचारांसाठी मदत मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या आरोग्य सप्ताहात सांगोला शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपलब्ध आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ यांनी केले आहे.
वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्यसेवेच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत
पोहोचण्याचा हा उपक्रम असून, त्याला तालुक्यातील नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.


0 Comments