Breaking News

सांगोल्याच्या पत्रकारांना संघटनेत महत्त्वाची जबाबदारी; अजित गायकवाड प्रदेशाध्यक्ष, शशिकांत कोळी यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची धुरा

सांगोल्याच्या पत्रकारांना संघटनेत महत्त्वाची जबाबदारी;


अजित गायकवाड प्रदेशाध्यक्ष, शशिकांत कोळी यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची धुरा

सांगोला प्रतिनिधी | सोलापूर, दि. १७ :

दि जर्नलिस्ट असोसिएशन ऑल इंडिया या संघटनेच्या सोलापूर जिल्हा कार्यकारणीची बैठक शासकीय विश्रामगृह येथे उत्साहात पार पडली.

 राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामदासजी ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश तसेच सोलापूर जिल्हा कार्यकारणीतील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

सांगोला तालुक्यातील पत्रकारांना संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असून, कडलास येथील अजित गायकवाड यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी, तर घेरडी येथील शशिकांत कोळी यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

यासोबतच पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी विजयाताई करनवर (जेऊर, ता. करमाळा), महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (ब विभाग) पदी पवन कुमार पुठ्ठेवार, सोलापूर जिल्हाध्यक्षपदी मोहम्मद शफी सरदार पटेल,

 जिल्हा उपाध्यक्षपदी सुहास हजारे, जिल्हा सचिवपदी प्रदीप उड्डानशू, सोलापूर शहराध्यक्षपदी दत्ता जाधव, शहर उपाध्यक्षपदी प्रसन्न दिवटे आणि शहर सचिवपदी सुहास हजारे यांची निवड जाहीर करण्यात आली.

बैठकीदरम्यान पत्रकारांच्या विविध समस्या, अडचणी आणि प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबाबत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामदासजी ताटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे यावेळी उपस्थित मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले. नव्या कार्यकारणीमुळे पत्रकारांच्या प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी प्रयत्नांना बळ मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments