Breaking News

‘नंदनवन’वर शहाजीबापू पाटील यांनी घेतले गणरायाचे दर्शन

‘नंदनवन’वर शहाजीबापू पाटील यांनी घेतले गणरायाचे दर्शन


महाराष्ट्राच्या सुख-समृद्धी व सर्वांगीण विकासासाठी केली प्रार्थना

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी ‘नंदनवन’ बंगल्यावर मा. आमदार शहाजीबापू पाटील यांनी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. 

यावेळी त्यांनी गणरायाच्या चरणी पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्राच्या सुख, समृद्धी आणि सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.

गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात शहाजीबापू पाटील यांनी श्री गणरायाचे दर्शन घेऊन महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-शांतीसाठी आशीर्वाद मागितले.

 राज्यातील सर्व नागरिकांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो, तसेच महाराष्ट्राची प्रगती आणि विकासाची वाटचाल अधिक गतिमान होवो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

“गणरायाची कृपादृष्टी सदैव महाराष्ट्रातील जनतेवर राहो आणि राज्याला सुख-समृद्धी लाभो,” अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

Post a Comment

0 Comments