Breaking News

सांगोला नगरपालिकेचे विद्यमान उपनगराध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त ‘रील स्पर्धे’चे संपन्न..

सांगोला नगरपालिकेचे विद्यमान उपनगराध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त ‘रील स्पर्धे’चे संपन्न..


सांगोला, दि. ७ : माणगंगा उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा सांगोला नगरपालिकेचे विद्यमान उपनगराध्यक्ष मा. नितीन (आबासाहेब) इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त माणगंगा परिवाराच्या वतीने भव्य ‘रील स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. युवकांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच तसेच माणगंगा परिवाराची सामाजिक, सहकार, 

कृषी व औद्योगिक क्षेत्रातील विकासाची वाटचाल सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा या स्पर्धेचा उद्देश आहे.या स्पर्धेसाठी ७ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत रील पोस्ट करता येणार असून, 15 सप्टेंबर २०२६ रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी रीलमध्ये #MANGANGAPARIVAR आणि #NITININGOLE हे हॅशटॅग वापरणे बंधनकारक आहे. तसेच रील पोस्ट करताना @NITINABASAHEBINGOLE या अकाउंटला Collaboration करणे आवश्यक आहे. Collaboration नसलेली रील स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही.

रील स्पर्धेसाठी ‘संघर्षातून नेतृत्वापर्यंत – कार्यकर्ता ते उपनगराध्यक्ष’, ‘युवकांच्या हाताला काम – रोजगार निर्मिती’, ‘सहकारातून समृद्धीकडे – माणगंगा परिवाराची वाटचाल’,

 ‘सामाजिक बांधिलकीतून जपलेले नेतृत्व’, ‘माणगंगा डेअरीचा अत्याधुनिक प्रकल्प’, ‘शेतीमध्ये AI आणि Satellite सेवा – पालवी ॲग्रीको’ तसेच ‘माणगंगा परिवाराची विकासाची १० वर्षांची वाटचाल’ हे विषय देण्यात आले आहेत.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून प्रथम क्रमांकास १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास १० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास ५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

 सर्वाधिक लाईक्स, कमेंट्स व व्ह्यूज तसेच रीलची आकर्षकता आणि विषयाची मांडणी या बाबींचा विचार करून विजेत्यांची निवड केली जाणार आहे.

तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना देखील आकर्षक अशे गिफ्ट देण्यात येणार आहे. .या स्पर्धेत सांगोला आणि मंगळवेढापरिसरातील युवक, विद्यार्थी, सोशल मीडिया क्रिएटर्स आणि माणगंगा परिवाराच्या हितचिंतकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, 

असे आवाहन माणगंगा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क :अक्षय मुढे : ८७९३८ १५८१६ | अभिजीत मुढे : ८९९९२ ९४९१७

Post a Comment

0 Comments