सांगोला पोलिसांची कोळा-जुनोनी रस्त्यावर धडक कारवाई; कारसह ३५ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला जप्त
सांगोला : सांगोला येथे अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बंदी असलेला सुगंधित पानमसाला जप्त केला आहे.
या कारवाईत सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळा-जुनोनी रस्त्यावर मारुती सुझुकी अल्टो (MH 12 HF 5742) या चारचाकी वाहनातून बेकायदेशीर साठवणूक आणि वाहतूक केला जाणारा रु. ३५,६०५/- किमतीचा सुगंधित पानमसाला जप्त करण्यात आला.
दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११:३० च्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित वाहनाची पाहणी केली. गाडीच्या डिकी व मधल्या सीटवर खाकी गोण्यांमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थ मिळून आले.
या प्रकरणी पोलिसांनी अतुल अनिल घाडगे (वय १९, रा. हातीत, ता. सांगोला) याला ताब्यात घेतले, तर वाहन मालक विलास देशमुख (रा. सांगोला) हा घटनास्थळावरून फरार झाला.
अन्न सुरक्षा अधिकारी गणेश महादेव कदम यांनी २९ ऑगस्ट २०२६ रोजी सांगोला पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे.रु. ३५,६०५/- किमतीचा प्रतिबंधित पानमसाला व अंदाजे रु. ४,००,०००/- किमतीची अल्टो कार.
अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६(२)(i), २६(२)(ii), २६(२)(iv), २७(३)(E), ३०(२)(A) आणि कलम ५९.भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३, २७४, २७५, १२३ आणि ३(५). हा प्रतिबंधित साठा कोणाकडून आणला व कुठे पुरवला जाणार होता, याचा तपास सुरू आहे. या गुन्ह्यामध्ये मुख्य पुरवठादार,
उत्पादक आणि आर्थिक लाभ घेणाऱ्यांची मोठी साखळी असण्याची शक्यता असल्याने, आरोपींवर 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम १९९९' (MCOCA) अंतर्गत कडक कारवाई करण्याची मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे.


0 Comments