मा.अतुल (मालक) पवार यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोला तालुक्यातील ७ महत्त्वाच्या रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा
सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून,
अतुल (मालक) पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तालुक्यातील सात महत्त्वाच्या रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मंजूर करण्यात आला आहे.
या मंजुरीमुळे एकूण १४.५० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये मेथवडे फाटा (कॅनॉल पूल) ते जोडरस्ता (२.०० कि.मी.), संगेवाडी–मेथवडे रस्ता (२.६० कि.मी.), संगेवाडी–शेटफळ रस्ता (२.०० कि.मी.), तुळशीराम पवार वस्ती ते संगेवाडी–मेथवडे रस्ता (२.०० कि.मी.),
तसेच एखतपूर गावठाण ते डी.एड. कॉलेज रस्ता (२.०० कि.मी.) यांचा समावेश आहे. उर्वरित मंजूर रस्त्यांची कामेही टप्प्याटप्प्याने हाती घेतली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून शेतकरी, विद्यार्थी, नागरिक आणि वाहनचालकांना मोठा लाभ मिळणार आहे.
रस्त्यांचा दर्जा उंचावल्याने भविष्यात विकासकामांना गती मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या मंजुरीबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत अतुल (मालक) पवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे स्वागत केले आहे.


0 Comments