Breaking News

सांगोल्यात पश्चिम महाराष्ट्रातील पहिला शिवसेना सोशल मीडिया मेळावा; डिजिटल प्रचारावर भर जिल्हा संपर्क प्रमुख अमित पाटील

सांगोल्यात पश्चिम महाराष्ट्रातील पहिला शिवसेना सोशल मीडिया मेळावा; डिजिटल प्रचारावर भर जिल्हा संपर्क प्रमुख अमित पाटील


सांगोला | प्रतिनिधी | दि. ४ जुलै २०२६ डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पहिला शिवसेना सोशल मीडिया मेळावा शनिवारी सांगोला येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

 अयोध्या नगरी येथील ॲड. शहाजीबापू पाटील सांस्कृतिक भवनात आयोजित या मेळाव्यात सोशल मीडियाच्या प्रभावी वापराबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

मेळाव्यात बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी, "आजच्या युगात सोशल मीडिया ही शिवसेनेची रक्तवाहिनी बनली आहे. 

सरकारची विकासकामे आणि जनहिताच्या योजना प्रत्येक नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची जबाबदारी सोशल मीडिया टीमवर आहे," असे सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राज्य सोशल मीडिया प्रमुख प्रतीक शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन सांगोला शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी युवासेना संपर्क प्रमुख सागर पाटील, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे, नगराध्यक्ष आनंद माने, नगरसेवक सोमेश यावलकर, बांधकाम सभापती माऊली तेली, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख महादेव सलवदे,

 समन्वयक सौरभ कुलकर्णी, उपसमन्वयक भूषण सुर्वे, जिल्हा संपर्क प्रमुख अमित पाटील यांच्यासह सांगोला तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो सोशल मीडिया स्वयंसेवक उपस्थित होते.

मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे महायुती सरकारच्या विविध शासकीय योजनांची माहिती एका QR कोडद्वारे उपलब्ध करून देणाऱ्या माहितीपत्रकाचे अनावरण. या उपक्रमामुळे नागरिकांना विविध योजनांची माहिती एका क्लिकवर सहज मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमात सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, फेक न्यूजला तथ्याधारित उत्तर देणे, शासनाच्या विकासकामांचा प्रभावी प्रचार आणि डिजिटल माध्यमातून संघटन अधिक सक्षम करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा संपर्क प्रमुख अमित पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments