डॉ.परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त ९ जुलै रोजी विशेष आरोग्य शिबिर; सर्व शस्त्रक्रियांवर ५० टक्के सवलत
सांगोला | प्रतिनिधी सांगोल्यातील खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे डॉ. परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी विशेष सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने रुग्णांसाठी हॉस्पिटल बिलामध्ये सर्व शस्त्रक्रियांवर तब्बल ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली असून, ही सवलत फक्त ९ जुलै २०२६ या एकाच दिवशी लागू राहणार आहे.
या विशेष आरोग्य उपक्रमात दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब, विषबाधा, सर्पदंश, थायरॉईड विकार, हृदयरोग, डेंग्यू, अर्धांगवायू आणि मलेरिया यांसारख्या विविध आजारांचे निदान, तपासणी व तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून दिला जाणार आहे.
याशिवाय महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) तसेच आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत पात्र रुग्णांना मोफत औषधोपचार व शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध आहे.
या संधीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्क:
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कड-लाम रोड, सांगोला.
📞 ७५८८५ ०६१९६ / ९६८९९ ८९०९०


0 Comments