Breaking News

मिरज रोड–वंदे मातरम चौक बायपास रस्त्यावरील १ कोटींच्या डेकोरेटिव्ह इलेक्ट्रिक पोल प्रकल्पाचे उद्या लोकार्पण

मिरज रोड–वंदे मातरम चौक बायपास रस्त्यावरील १ कोटींच्या डेकोरेटिव्ह इलेक्ट्रिक पोल प्रकल्पाचे उद्या लोकार्पण


सांगोला | प्रतिनिधी सांगोला शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या मिरज रोड ते वंदे मातरम चौक बायपास रस्त्यावरील डेकोरेटिव्ह इलेक्ट्रिक पोल प्रकल्पाचे लोकार्पण बुधवारी, दि. ८ जुलै २०२६ रोजी सकाळी ७ वाजता वंदे मातरम चौक येथे होणार आहे.

 या प्रकल्पामुळे शहराच्या मुख्य मार्गाला आकर्षक आणि आधुनिक स्वरूप प्राप्त होणार असल्याची माहिती सांगोला नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांनी दिली.

सुमारे १ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला असून, रस्त्यावरील प्रकाशव्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि देखणी करण्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वाचे मानले जात आहे.

या लोकार्पण सोहळ्यास आमदार शहाजीबापू पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख,

 माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ आणि भाजप नेते बाळासाहेब एरंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

याशिवाय उपनगराध्यक्ष नितीन इंगोले, नगरसेवक तथा शिवसेना गटनेते प्रशांत धनवजीर, बांधकाम सभापती माऊली तेली, पाणीपुरवठा सभापती वैशाली सावंत, आरोग्य सभापती गोदाबाई बनसोडे, 

महिला व बालकल्याण समिती सभापती छायाताई मेटकरी, मुख्याधिकारी सुधीर गवळी तसेच नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments