स्वर्गीय मा.णपतराव देशमुख सूत गिरणीला सरकारी मदत! ६३ लाखांच्या व्याज परतव्याला राजकीय रंग
डॉ. भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणीला व्याज परतवा योजनेअंतर्गत ६३ लाख ३५ हजार ३३१ रुपयांचा व्याज परतवा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विधान परिषदेच्या सोलापूर
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना दिवंगत गणपतराव देशमुख यांचे नातू आणि शेकापचे सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख उपस्थित होते.
त्या पार्श्वभूमीवर या व्याज परतव्याला राजकीय रंग प्राप्त झाला आहे.
राज्यातील सहकारी सूतगिरण्या सुरळीत चालाव्यात, आर्थिक अडचणीतून बाहेर याव्यात, या करिता राज्य सरकारने सूतगिरण्याच्या मध्यम मुदतीच्या कर्जावर १२ टक्के व्याज
परतव्याची योजना सुरू केली होती. सांगोल्यातील गणपतराव देशमुख सूतगिरणीने सोलापूर जिल्हा बँकेकडून २१ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.
प्रती चाती पाच हजार रुपये प्रमाणे १२ टक्के व्याज दराच्या मर्यादेत ६३ लाख ३५ हजार ३३१ रुपयांचा व्याज परतवा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या बाबतचा शासन आदेश बुधवारी प्रसिद्ध झाला आहे.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख महाआघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आहेत. महाविकास आघाडीचे आमदार असूनही विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था
मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना डॉ. देशमुख उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यापाठोपाठ त्यांच्या सूत गिरणीला सरकारी मदत जाहीर झाल्याने त्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे.


0 Comments