Breaking News

सांगोला विद्यामंदिरच्या प्राचार्यपदी चारूदत्त जगताप यांची नियुक्ती

सांगोला विद्यामंदिरच्या प्राचार्यपदी चारूदत्त जगताप यांची नियुक्ती


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला प्रतिनिधी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला Vidyamandir प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यपदी चारूदत्त दिगंबर जगताप यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे व सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नूतन प्राचार्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्था सदस्य दिगंबर जगताप, माजी प्राचार्य बिभीषण माने, पर्यवेक्षक उत्तम सरगर, काकासो नरूटे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

चारूदत्त जगताप यांचा शैक्षणिक, क्रीडा आणि प्रशासकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव संस्थेसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. त्यांनी सांगोला विद्यामंदिर प्रशालेत ११ वर्षे आणि नाझरा विद्यामंदिर येथे १६ वर्षे सहशिक्षक म्हणून कार्य केले आहे.

 त्यानंतर कोळा विद्यामंदिर येथे दोन वर्षे पर्यवेक्षक म्हणून तर सांगोला विद्यामंदिर येथे उपमुख्याध्यापक म्हणून त्यांनी प्रभावी प्रशासनाची छाप पाडली.

अध्यापन आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानामुळे त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला असून, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना तालुका, जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील विविध प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

नियुक्तीबद्दल संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष ॲड. विजयसिंह चव्हाण, खजिनदार शंकरराव सावंत, कार्यकारिणी सदस्या शीलाकाकी झपके, विश्वेश झपके, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

चौकट

"संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी घालून दिलेल्या आदर्शांना स्मरून सांगोला विद्यामंदिरची समृद्ध परंपरा अधिक उज्ज्वल करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.

 विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व कौशल्यात्मक विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत आधुनिक शालेय प्रशासन राबविण्यावर भर दिला जाईल."

— चारूदत्त दिगंबर जगताप

नूतन प्राचार्य, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज

Post a Comment

0 Comments