Breaking News

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे जवळ्यात आगमन; शारदादेवी आणि काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या स्मृतीला भावपूर्ण अभिवादन

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे जवळ्यात आगमन; शारदादेवी


आणि काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या स्मृतीला भावपूर्ण अभिवादन

सांगोला : देशाचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री तथा आर.पी.आय.चे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदासजी आठवले यांनी शनिवार दि.३० मे रोजी सांगोला तालुक्यातील जवळा येथील

 शारदाई आध्यात्मिक नगरीला भेट देत स्व. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील आणि ह.भ.प. स्व. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या स्मृतीस्थळास अभिवादन केले.

यावेळी त्यांनी स्मृतीस्थळाची पाहणी करत स्व. काकासाहेब साळुंखे पाटील यांनी सांगोला तालुक्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची माहिती जाणून घेतली. 

तसेच अध्यात्म, संस्कार आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या कार्याबद्दलही गौरवोद्गार काढले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या या भेटीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील,

 आर.पी.आय.चे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, तालुका अध्यक्ष खंडूतात्या सातपुते यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या ना. आठवले यांनी सामाजिक आणि आध्यात्मिक वारशाची जपणूक करणाऱ्या या स्मृतीस्थळाला भेट देत साळुंखे पाटील परिवाराच्या कार्याचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments