Breaking News

“बालविवाहाला पोलिसांचा चाप; सांगोला निर्भया पथकामुळे अनेक मुलींना मिळाले सुरक्षित भविष्य!”

“बालविवाहाला पोलिसांचा चाप; सांगोला निर्भया पथकामुळे अनेक मुलींना मिळाले सुरक्षित भविष्य!”


सांगोला तालुक्यात बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक समस्येविरोधात सांगोला पोलिसांनी धडाकेबाज आणि संवेदनशील कारवाई करत

 अनेक अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखण्यात मोठे यश मिळवले आहे. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे अनेक मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षित भविष्य वाचले असून समाजात सकारात्मक संदेश पोहोचला आहे.

एप्रिल २०२६ ते मे २०२६ या कालावधीत तालुक्यातील विविध भागांत १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलींचे होणारे तब्बल पाच बालविवाह सांगोला पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून थांबवले. 

यापूर्वी जानेवारी, फेब्रुवारी आणि नोव्हेंबर महिन्यातही १७ वर्षांच्या मुलींचे बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश आले होते. या कारवाईमुळे अनेक मुलींना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात राहण्याची संधी मिळाली आहे.

बालविवाह हा केवळ कायद्याने गुन्हा नसून तो मुलींच्या आरोग्य, मानसिक विकास आणि शैक्षणिक आयुष्यावर गंभीर परिणाम करणारा सामाजिक प्रश्न आहे. 

याच पार्श्वभूमीवर सांगोला पोलिसांकडून सातत्याने जनजागृती, समुपदेशन आणि तातडीने कारवाई केली जात आहे.

या मोहिमेत निर्भया पथकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. बालविवाहाची माहिती मिळताच निर्भया पथक घटनास्थळी दाखल होत 

संबंधित कुटुंबांचे समुपदेशन करत होते. तसेच अल्पवयीन मुलींचे संरक्षण करून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे अनेक बालविवाह वेळेत रोखणे शक्य झाले.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर तसेच पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चव्हाण, GPSI राऊत, HC/१६५२ कोष्टी, पोना/१२२८ जाधव, पोना/८३५ लेंगरे आणि PC/२९९ कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले.

“बालविवाह रोखा, मुलींना शिक्षण द्या” हा संदेश देत सांगोला पोलिस आणि निर्भया पथकाने समाजासमोर संवेदनशील पोलिसिंगचे प्रेरणादायी उदाहरण उभे केले आहे.

Post a Comment

0 Comments