Breaking News

मोदींच्या ‘ग्रीन इंडिया’ संदेशाला प्रतिसाद; सभापती चैतन्यसिंह केदार यांचा इलेक्ट्रिक वाहनातून सोलापूर प्रवास

मोदींच्या ‘ग्रीन इंडिया’ संदेशाला प्रतिसाद; सभापती चैतन्यसिंह केदार यांचा इलेक्ट्रिक वाहनातून सोलापूर प्रवास


सोलापूर : देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांनी दिलेल्या पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या आवाहनाला प्रतिसाद देत


 सांगोला येथील जिल्हा परिषद आरोग्य समितीचे सभापती मा. चैतन्यसिंह केदार यांनी अनोख्या पद्धतीने जनजागृती केली.

 त्यांनी जोतिर्लिंग निवासस्थान ते जिल्हा परिषद कार्यालय, सोलापूर हा संपूर्ण प्रवास इलेक्ट्रिक वाहनातून करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

यावेळी बोलताना केदार यांनी सांगितले की, “कमी गाड्या म्हणजे कमी प्रदूषण, इंधनाची बचत आणि परकीय चलनाची मोठी बचत होय. 

पर्यावरण संरक्षणासोबत राष्ट्रहित जपणे हीच नव्या भारताची खरी ओळख आहे.”

पुढे त्यांनी नागरिकांना पंतप्रधानांच्या संदेशाचे पालन करण्याचे आवाहन करताना सार्वजनिक वाहतूक,

 सायकल तसेच पर्यावरणपूरक वाहनांचा अधिकाधिक वापर करण्याची गरज व्यक्त केली. त्यांच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत 

असून, पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे समाजाने वाटचाल करावी, असा सकारात्मक संदेश या माध्यमातून देण्यात आला.

Post a Comment

0 Comments