Breaking News

भीमा नदी पुलावरून तरुणाची उडी; माचणूर हादरले, दारूच्या नशेत टोकाचे पाऊल

भीमा नदी पुलावरून तरुणाची उडी; माचणूर हादरले, दारूच्या नशेत टोकाचे पाऊल


मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे भीमा नदी पुलावरून एका ३२ वर्षीय तरुणाने नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुमार नेताजी साळुंखे (वय ३२, रा. घोडेश्वर) यांनी रविवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत असताना

 माचणूर येथील भीमा नदी पुलावरून अचानक नदीपात्रात उडी घेतली. ही घटना पाहताच परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कुमार साळुंखे यांना बाहेर काढून

 उपचारासाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

या प्रकरणी दत्ता तुळशीराम माने यांनी माहिती दिली असून मंगळवेढा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

या घटनेमुळे माचणूर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments