सांगोला नगरपरिषद डिजिटल जनगणनेचा नवा अध्याय; १ ते १५ मेदरम्यान ‘स्वगणना’ची संधी
सांगोला : यंदाची जनगणना प्रक्रिया अत्याधुनिक पद्धतीने पार पडणार असून ती पूर्णपणे डिजिटल स्वरूपात राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे,
नागरिकांना आता ‘स्वगणना’ (Self Enumeration) या सुविधेद्वारे स्वतःच्या कुटुंबाची माहिती स्वतः नोंदविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
नागरिकांनी दि. १ मे ते १५ मे या कालावधीत मध्यरात्रीपर्यंत http://se.census.gov.in� या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वगणना करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यानंतर दि. १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणक (Enumerator) प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन माहिती संकलित करणार आहेत. ज्यांनी स्वगणना पूर्ण केली आहे, त्यांनी मिळालेला स्वगणना आयडी प्रगणकास सादर करून सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले आहे.
डिजिटल जनगणनेमुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि अचूक होणार असून नागरिकांच्या सक्रिय सहभागावर या उपक्रमाचे यश अवलंबून आहे.
— डॉ. सुधीर गवळी
जनगणना चार्ज ऑफिसर तथा मुख्याधिकारी
नगरपरिषद, सांगोला


0 Comments