Breaking News

संतापजनक! वृद्ध आईला न सांभाळता लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर दिले हाकलून; 'या' कायद्याअंतर्गत मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

संतापजनक! वृद्ध आईला न सांभाळता लाथाबुक्क्यांनी मारहाण करून


घराबाहेर दिले हाकलून; 'या' कायद्याअंतर्गत मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

आई-वडिलांना सांभाळण्याच्या मोबदल्यात शेतजमीन लिहून घेतलेल्या मुलाकडून वृद्ध आईला न सांभाळता मारहाण करून हाकलून 

देण्याचा धक्कादायक प्रकार आळजापूर (ता.करमाळा) येथे उघडकीस आला आहे.

याप्रकरणी वृद्ध आईने थेट पोलिस ठाण्यात धाव घेऊन मुलाविरुद्ध फिर्याद दिली आहे. मच्छिंद्र नाना काळे, असे गुन्हा नोंदलेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत कौसाबाई नाना काळे (वय ६५, रा. आळजापूर, ता. करमाळा) यांनी १५ एप्रिल रोजी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

यात म्हटले आहे की, त्यांच्या दोन मुलांपैकी मच्छिंद्र नानासाहेब काळे यांनी वडील नाना काळे हे मयत 

होण्याच्या अगोदर आई व वडिलांना सांभाळण्याचे कबूल करून वडिलांकडून जमीन नावावर करून घेतली होती.

मात्र, काही दिवसांनी वडील मयत झाल्यानंतर मुलगा मच्छिंद्र याने फिर्यादी आईला घराच्या बाहेर काढले. औषधोपचारासाठी खर्च न करता उपाशीपोटी मारहाण करून घरातून 

हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला असून, तपास फौजदार ज्ञानेश्वर दळवी करीत आहेत.

जिवे मारण्याची दिली धमकी

घरातून हाकलून दिल्यानंतर फिर्यादी कौसाबाई या मच्छिंद्र यांच्या नावे असलेल्या शेतामध्ये छपराचे घर करून राहत होत्या. नंतर कौसाबाई यांना ग्रामपंचायतीकडून घरकुल मिळाल्याचे

 समजल्यानंतर १४ एप्रिल रोजी सकाळी ९च्या सुमारास मच्छिंद्रने 'तू माझ्या रानात घर बांधायचे नाही' असे म्हणत मारहाण करीत आईला जिवे मारण्याची धमकी देत हाकलून दिले.

फिर्यादीची आई कौसाबाई यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी त्यांचा मुलगा मच्छिंद्र काळे यांच्याविरुद्ध ज्येष्ठ 

नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम २००७ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदला आहे.

Post a Comment

0 Comments