google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 “१० हजारांचे कर्ज… पण सावकारांचा सापळा! ६ वर्षांत ७ लाख वसूल करूनही विधवेवर घर खाली करण्यासाठी दबाव”

Breaking News

“१० हजारांचे कर्ज… पण सावकारांचा सापळा! ६ वर्षांत ७ लाख वसूल करूनही विधवेवर घर खाली करण्यासाठी दबाव”

“१० हजारांचे कर्ज… पण सावकारांचा सापळा! ६ वर्षांत ७ लाख वसूल करूनही विधवेवर घर खाली करण्यासाठी दबाव” 


करमाळा | प्रतिनिधी खाजगी सावकारकीच्या जाळ्यात अडकलेल्या एका विधवा महिलेची धक्कादायक कहाणी

 करमाळा तालुक्यातील जेऊर येथून समोर आली आहे. अवघ्या १० हजार रुपयांच्या कर्जासाठी तब्बल ७ लाख रुपये 

देऊनही मुद्दल व व्याजाच्या नावाखाली आणखी साडेपाच लाखांची मागणी करत राहते घर खाली

 करण्यासाठी सावकारांकडून दमदाटी, शिवीगाळ व धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे.

याप्रकरणी सुषमा विजय वनकळस यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली 

असून, पोलिसांनी रुक्मिणी किसन माने, पूजा सागर माने, सागर किसन माने आणि पूनम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, २०१९ साली वनकळस यांनी गावातील रुक्मिणी माने यांच्याकडून १० हजार रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. 

मात्र, या कर्जावर चक्रवाढ पद्धतीने व्याज लावत सावकारांनी आतापर्यंत तब्बल ७ लाख रुपये वसूल केले.

इतकेच नव्हे, तर व्याजाच्या मोबदल्यात ८ जुलै २०२० रोजी फिर्यादीचे जेऊर येथील राहते

 घरही लिहून घेण्यात आले. हे घर पुढे पूजा सागर माने यांच्या नावावर करण्यात आले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तरीदेखील, “व्याजाचे पैसे दे नाहीतर घर खाली कर,” असा दम देत पुन्हा ७ टक्के दराने

 बेकायदेशीर व्याज आकारून आणखी ५ लाख ५० हजार रुपये बाकी असल्याचे सांगितले जात आहे. 

यासाठी वारंवार घरी येऊन दमदाटी, शिवीगाळ आणि धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप आहे.

तसेच, सागर माने यांची बहीण पूनम हिनेही व्याजापोटी दीड लाख रुपये घेऊन घराचा व्यवहार मिटवण्यासाठी नोटरी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, खाजगी सावकारकीच्या वाढत्या अत्याचारांवर 

कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments