Breaking News

बालविवाहाचा बळी! 14 वर्षीय नवविवाहितेने छळाला कंटाळून संपवलं जीवन; मंगळवेढा हादरलं

बालविवाहाचा बळी! 14 वर्षीय नवविवाहितेने छळाला कंटाळून संपवलं जीवन; मंगळवेढा हादरलं


मंगळवेढा (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. खेळण्या-बागडण्याच्या

 वयात लग्नाच्या बंधनात अडकवलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना

 समोर आली असून, या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

📌 बालविवाहातून सुरू झालेली दुःखद कहाणी

बावची-निंबोणी परिसरातील या मुलीचा काही महिन्यांपूर्वी गुपचूप बालविवाह लावण्यात आला होता. 

वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी संसाराची जबाबदारी तिच्यावर टाकण्यात आली. मात्र, हा संसार तिच्यासाठी आनंदाचा नव्हे तर यातनांचा ठरला.

⚠️ छळ, मारहाण आणि जबरदस्तीचा त्रास

लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून तिला घरकामासाठी सतत राबवले जात होते.

 किरकोळ कारणांवरून मारहाण केली जात होती. इतकेच नव्हे तर पतीकडूनही तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले

 जात असल्याचा आरोप आहे. सततच्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे ती पूर्णपणे खचली होती.

💔 टोकाचा निर्णय; संपलं आयुष्य

हा असह्य त्रास सहन न झाल्याने अखेर या निष्पाप मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

 तिच्या मृत्यूने परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

👮‍♂️ पोलिसांची तत्पर कारवाई

या घटनेनंतर मंगळवेढा पोलिसांनी त्वरीत कारवाई करत पती, सासरे आणि इतर नातेवाईकांसह 

एकूण 5 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

यापैकी पती आणि सासऱ्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. 

पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

⚖️ समाजासाठी गंभीर इशारा

ही घटना बालविवाहाच्या अनिष्ट प्रथेमुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची जाणीव करून देणारी आहे. 

अजूनही ग्रामीण भागात सुरू असलेल्या अशा प्रथांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments