google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..सांगोल्यात अवैध गॅस वापरावर प्रशासनाचा धडक छापा; दोन हॉटेल्सची सखोल तपासणी, नियमभंगास कडक इशारा

Breaking News

खळबळजनक..सांगोल्यात अवैध गॅस वापरावर प्रशासनाचा धडक छापा; दोन हॉटेल्सची सखोल तपासणी, नियमभंगास कडक इशारा

खळबळजनक..सांगोल्यात अवैध गॅस वापरावर प्रशासनाचा धडक छापा;



दोन हॉटेल्सची सखोल तपासणी, नियमभंगास कडक इशारा

सांगोला :अवैध गॅस वापरावर आळा घालण्यासाठी सांगोला शहरात पुरवठा विभागाने धडक कारवाई करत विशेष तपासणी मोहीम राबवली.

 शहरातील कडलास नाका व बसस्थानक परिसरात ही मोहीम राबवण्यात आली असून हॉटेल व्यवसायिकांना कडक इशारा देण्यात आला आहे.

सांगोला शहरात काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 

पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रांजली गावंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अचानक छापे टाकत परिस्थितीची पाहणी केली.

पथकाने सर्वप्रथम कडलास नाका येथील बालाजी हॉटेल येथे भेट देत गॅस वापर, साठवणूक व सुरक्षेची तपासणी केली.

 त्यानंतर बसस्थानक परिसरातील हॉट स्पाईस या हॉटेलमध्येही सखोल तपासणी करण्यात आली.

 या दोन्ही ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर आढळून आला असला तरी नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत संबंधितांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

तपासणीदरम्यान हॉटेल मालक व चालकांना ठणकावून सांगण्यात आले की, घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणे हा गंभीर नियमभंग असून अशा प्रकरणांवर कोणतीही तडजोड न करता 

तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल. व्यावसायिक वापरासाठी केवळ अधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडरच वापरणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने पुन्हा एकदा अधोरेखित केले.

या मोहिमेत गॅस साठवणूक, वापराची पद्धत, सुरक्षेचे नियम तसेच आवश्यक परवान्यांची पडताळणी यावर विशेष भर देण्यात आला. 

पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रांजली गावंडे यांच्यासह पुरवठा निरीक्षक प्रियांका जाधव, पुरवठा लिपिक निकिता पाटील व सोनाली जाधव यांनी सक्रिय सहभाग घेत ही कारवाई यशस्वी केली.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही केवळ सुरुवात असून पुढील काळात अशा तपासण्या अधिक तीव्र केल्या जाणार आहेत. 

नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असून कोणालाही सूट दिली जाणार नाही.

दरम्यान, नागरिकांनाही आवाहन करण्यात आले आहे की, कुठेही अवैध गॅस वापर किंवा साठेबाजी आढळल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे. 

सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने गॅसचा योग्य व नियमबद्ध वापर अत्यंत आवश्यक असून याबाबत कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही, असा ठाम इशारा प्रशासनाने दिला आहे.

Post a Comment

0 Comments