google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्..., सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

Breaking News

आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्..., सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्...,


सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

सोलापूर : सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर शहरातील कलावती नगरात राहत्या घरी पती-पत्नीचे मृतदेह आढळून 

आल्याने खळबळ उडाली. पती पत्नी दोघेही तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत सापडल्याने ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत संशय निर्माण झाला आहे.

सोमनाथ धानप्पा पाटील आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील असे मृत आढळलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

 घरात पती-पत्नीसह दोन मुलीही होत्या, मात्र सकाळी आई वडील झोपेतून उठत नसल्याचे कळताच मुलींनी काकांना फोन करुन ही घटना सांगितली. 

त्यानंतर दोघांनाही शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान दोघांच्या मृतदेहाजवळ एक चिट्ठी  सापडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पोलिसांनी त्याबाबत दुजोरा दिलेला नाही. एमआयडीसी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

तोंडातून फेस येत असल्याचे त्यांच्या मुलींनी पाहिले

मृत सोमनाथ आणि श्रीदेवी यांना दहा वर्षाची धनश्री व सहा वर्षाची देवयानी अशा दोन मुली आहेत. शुक्रवारी (दि.२७) सकाळी सहाच्या सुमारास सोमनाथ आणि श्रीदेवी हे दोघे घरात बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे त्यांच्या मुलींनी पाहिले. 

ते पाहताच त्यांनी घाबरून लगेच आपल्या काकांना फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच त्यांचे काका नागनाथ हे घटनास्थळी आले. त्यांनी दोघांना लगेच श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. 

मात्र, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. सोमनाथ पाटील यांचा पूर्वी शेळीपालनाचा व्यवसाय होता नंतर त्यांनी घरातच किराणा दुकान सुरू केले होते. शवविच्छेद‌नानंतर दुपारी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार

दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक कारणांमुळे हा प्रकार घडला असावा, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

 मात्र, अधिकृत कारण स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळावरून काही वस्तू जप्त करण्यात आल्या असून त्यांची तपासणी केली जात आहे. 

मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे कलावती नगर परिसरात शोककळा पसरली असून दोन चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

 एमआयडीसी पोलीस विविध अंगांनी तपास करत असून आत्महत्या की घातपात, याबाबत सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments