google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा! खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध योजनांतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया

Breaking News

सांगोल्यात अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा! खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध योजनांतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया

सांगोल्यात अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा! खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध योजनांतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया


सांगोला : सांगोला शहरातील कडलास रोडवर सुरू असलेल्या खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा आणि विविध शासकीय योजनांतर्गत सर्वसामान्य

 रुग्णांना मोफत किंवा कॅशलेस उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने हॉस्पिटलमध्ये अनेक विशेष विभाग सुरू करण्यात आले आहेत.

या हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PM-JAY), महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY), बांधकाम कामगार योजना, मुख्यमंत्री सहायता निधी तसेच ESIC आणि विविध इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध असून पात्र रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतात.

हॉस्पिटलमध्ये मॅटर्निटी, सर्जिकल, मेडिसिन, अस्थिरोग, नेत्ररोग, त्वचारोग, बालरोग, कान-नाक-घसा विभाग तसेच ट्रॉमा केअर सेंटर अशा अनेक विभागांची सुविधा आहे. विशेष म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीमध्ये मुलगी झाल्यास हॉस्पिटलचे बिल पूर्णपणे माफ केले जाईल, अशी सामाजिक उपक्रमाची घोषणा हॉस्पिटल प्रशासनाने केली आहे.

याशिवाय प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला मोफत सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात येते. हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ICU, NICU, PICU, स्वतंत्र ओपीडी, प्रसूती विभाग, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम, डिजिटल

 एक्स-रे, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, सी-आर्मद्वारे शस्त्रक्रिया, व्हेंटिलेटर, ईसीजी, सिरिंज पंप, कॉल्पोस्कोपी, अत्याधुनिक डोळे तपासणी मशीन आदी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच २४ तास अॅम्ब्युलन्स, मेडिकल, लॅबोरेटरी व आपत्कालीन सेवा सुरू आहेत.

स्त्रीरोग विभागात नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन, बिनटाका प्रसूती, गर्भाशय पिशवी काढणे, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया तर मेडिसिन विभागात दमा, मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, अर्धांगवायू, सर्पदंश, थायरॉईड, न्यूमोनिया यांसारख्या आजारांवर उपचार केले जातात.

सर्जरी विभागात अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसील, मुळव्याध, टॉन्सिल, नाकातील हाड, किडनी व मुतखडा विकार यांचे निदान व शस्त्रक्रिया करण्यात येतात. तसेच त्वचा व केस रोग विभाग, एंडोस्कोपी, सायनस सर्जरी, सोनोग्राफी, बालरोग विभाग, अस्थिरोग विभागात फ्रॅक्चर व संधिवात उपचार उपलब्ध आहेत.

या हॉस्पिटलमध्ये डॉ. अजित औताडे (ENT व त्वचारोग तज्ञ), डॉ. धवल आवताडे (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. बसवराज बिराजदार, डॉ. परेश खंडागळे (जनरल फिजिशियन), डॉ. स्वाती खंडागळे, डॉ. शेखर जवळगे आणि डॉ. दीपांकर चंद्रकापूरे यांसारखे तज्ज्ञ डॉक्टर सेवा देत आहेत.

पत्ता : खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कडलास रोड, सांगोला (बस नाका पासून सुमारे ५०० मीटर अंतरावर)

संपर्क : 7588500197 / 9689989090

ग्रामीण भागातील रुग्णांना आधुनिक सुविधा आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळत असल्याने खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला परिसरातील रुग्णांसाठी मोठा आधार ठरत आहे.

Post a Comment

0 Comments