Breaking News

सामान्याचा पोरगा अतुल पवार प्रस्थापितांच्या रडारवर; अदृश्य शक्तींचा घेराव उघड

सामान्याचा पोरगा अतुल पवार प्रस्थापितांच्या रडारवर; अदृश्य शक्तींचा घेराव उघड


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

जवळा जिल्हा परिषद गटात जेव्हा प्रस्थापितांना आपले अस्तित्व गमावण्याची भीती वाटू लागते, तेव्हा ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, याचे जिवंत उदाहरण म्हणजे अतुल (मालक) पवार यांच्याविरोधात सुरू असलेला घाणेरडा डाव.

सामान्य घरातला हा पोरगा — जो लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी रात्रंदिवस रक्ताचं पाणी करतो, स्वतःचा प्रपंच बाजूला ठेवून जनतेसाठी उभा राहतो — तोच आज प्रस्थापितांच्या डोळ्यात खुपतो आहे. कारण हा नेता लोकांच्या हृदयात घर करून बसलाय आणि हीच गोष्ट प्रस्थापितांना अस्वस्थ करते आहे.

म्हणूनच अतुल पवार यांना रोखण्यासाठी आजी-माजी आमदार, पडद्यामागील अदृश्य शक्ती प्रचंड प्रमाणात सक्रिय झाल्या असून, विनाकारण खोट्या बातम्या, 

अपप्रचार आणि बदनामीचे षड्यंत्र रचले जात आहे. मात्र जवळा जिल्हा परिषद गटातील जनता भोळी नाही तर चाणाक्ष आहे — आणि येत्या सात तारखेला ती याचा जोरदार प्रत्युत्तर देणार, यात शंका नाही.

अतुल पवार यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही जाती-पातीचे राजकारण केले नाही. म्हणूनच हा नेता कोणत्याही एका जातीचा वाटत नाही, 

तर सर्व समाजांचा नेता वाटतो. पाच वर्षे कार्यालय उघडे ठेवून लोकांचे प्रश्न ऐकणारा, मदतीसाठी धावून जाणारा आणि प्रत्येकाला आपलासा वाटणारा नेता म्हणजेच अतुल पवार.

प्रस्थापितांनी कितीही अडवणूक केली, अन्यायाचे कितीही डाव खेळले, तरी जवळा जिल्हा परिषद गटातील मायबाप जनता अतुल मालक पवार यांच्या पाठीशी ठाम उभी आहे.

सत्ता, पैसा आणि षड्यंत्राच्या जोरावर जनतेचा आवाज दाबता येईल, असा भ्रम प्रस्थापितांनी सोडून द्यावा — कारण या लढतीत जनता निर्णायक आहे आणि जनता अतुल पवारांसोबत आहे.

विजयभव… ✊⏰

Post a Comment

0 Comments