google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील तामजाई देवी यात्रेनिमित्ताने मंगळवारी चिकमहूद येथे कुस्ती मैदान

Breaking News

सांगोला तालुक्यातील तामजाई देवी यात्रेनिमित्ताने मंगळवारी चिकमहूद येथे कुस्ती मैदान

सांगोला तालुक्यातील तामजाई देवी यात्रेनिमित्ताने मंगळवारी चिकमहूद येथे कुस्ती मैदान


महूद, ता. १४ : चिकमहूद (ता. सांगोला) येथील ग्रामदेवता तामजाई देवी यात्रेनिमित्त महापूजा, निकाली कुस्तीचे मैदान, 

करमणुकीचे कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात्रेनिमित्ताने रविवारी (ता. १५) सकाळी साडेनऊ वाजता तामजाई देवीची वेदमूर्ती 

राजनशास्त्री हिवरकर व वेदमूर्ती चैतन्यशास्त्री हिवरकर (घनपाटी) यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात येणार आहे. 

तर २१ जोडप्यांकडून देवीची महापूजा करण्यात येणार आहे. तसेच मंगळवारी (ता. १७) तामजाईबन येथे यात्रेचा मुख्य उत्सव होणार आहे.

मंगळवारी दुपारी दोन वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. 

यामध्ये एक लाख रुपये इनामासाठी विकास पवार (दिघंची) विरुद्ध उदयसिंह खांडेकर (बामणी), समर्थ चौरे

 (कोल्हापूर) विरुद्ध सनी राऊत (केतकी निमगाव), रोहित जाधव(महूद) विरुद्ध प्रशांत चंदनकर (कुर्डुवाडी) यांच्यात कुस्ती होणार आहे. 

पंच्याहत्तर हजार रुपये इनामासाठी ओम माने (खुडुस) विरुद्ध रोहन जाधव (बारामती),

 रणजित आगलावे (आटपाडी) विरुद्ध चैतन्य टिकोळे (खुडुस), अतुल काळेल (विटा) विरुद्ध कल्याण नाईकनवरे (कोल्हापूर) यांच्यात कुस्ती रंगणार आहे. 

एक्कावन्न हजार रुपये इनामासाठी शुभम हाके (वाखरी) विरुद्ध दादा घुले(अकलूज), अमर रणदिवे(दिघंची) विरुद्ध बालाजी जाधव (वाखरी)

, विराज दिघे (महूद) विरुद्ध पवन शिंदे (वाखरी), रणजित मदने(बंडगरवाडी) विरुद्ध संभाजी चव्हाण (अकलूज), प्रदीप मदने

(बंडगरवाडी) विरुद्ध दादा यमगर (केतकी निमगाव) यांच्यात कुस्तीचा सामना रंगणार आहे. बुधवारी (ता.१८) देवीच्या दैत्याला नैवेद्य कार्यक्रम होणार आहे.

 तर शुक्रवारी (ता. २०) लावण्यखणी हा करमणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 चिकमहूद ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच शोभा कदम यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments