मा. अतुल (मालक) पवार यांचा उत्साहात सत्कार; राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष संतोष येडगे व मान्यवरांची उपस्थितीत
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
परिसरातील लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या मा. अतुल (मालक) पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी पंचायत समिती सदस्य अँड. विश्वास गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष संतोष येडगे, व्यापारी आघाडीचे स्वप्नील लोखंडे,
माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब नारनवर, सागर ढाळे, नितीन मेटकरी, सागर कदम तसेच इतर मित्रपरिवार उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी मा. मालक पवार यांच्या विकासकामांचा आणि जनसंपर्काच्या शैलीचा विशेष उल्लेख केला. सर्वसामान्यांसाठी सातत्याने झटणारे नेतृत्व म्हणून
त्यांची ओळख निर्माण झाली असून आगामी काळातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची गती कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
फेटे, पुष्पहार आणि टाळ्यांच्या कडकडाटात झालेल्या या सत्कारामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी विकासाच्या कामांबाबत एकजूट दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला.
हा सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.


0 Comments