google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात व्यापार्‍याच्या मालमत्तेची खाजगी सावकारीतून तोडफोड ; जवळ्यातील 12 जणांवर गुन्हा दाखल खाजगी सावकारीतून बळकावलेल्या जागेतील साहित्य चोरल्याचा आरोप

Breaking News

सांगोल्यात व्यापार्‍याच्या मालमत्तेची खाजगी सावकारीतून तोडफोड ; जवळ्यातील 12 जणांवर गुन्हा दाखल खाजगी सावकारीतून बळकावलेल्या जागेतील साहित्य चोरल्याचा आरोप

सांगोल्यात व्यापार्‍याच्या मालमत्तेची खाजगी सावकारीतून तोडफोड ; जवळ्यातील


12 जणांवर गुन्हा दाखल खाजगी सावकारीतून बळकावलेल्या जागेतील साहित्य चोरल्याचा आरोप

 सांगोला/प्रतिनिधी ः सांगोला शहरातील कडलास रोडवरील जागा जवळ्याच्या खाजगी सावकाराने बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. 

कब्जा असताना कब्जा उध्वस्त करणार्‍या 12 जणांवर सांगोला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जवळ्याचे खाजगी सावकार बाळासाहेब शंकर कोरे व बजरंग महादेव बर्वे यांनी कडलास रोडवरील सुनील शिवाजी शिंदे यांनी जागा परत देण्याच्या बोलीवर दस्त नोंदवून घेतला होता.

 त्या जागेत आजही सुनील शिवाजी शिंदे यांचा कब्जा व वहिवाट आहे. मुद्दल व व्याजासहित पैसे परत देऊनही खरेदी दस्त फिरवून देण्यास या खाजगी सावकारांनी टाळाटाळ केली. 

या जागेत सुनील शिवाजी शिंदे यांचे सिमेंटसह बिल्डिंग मटेरियल चे सुरज ट्रेडर्स नावाचे दुकान चालू आहे.  जमीन गट नंबर 128/2/अ/11 क्षेत्र 8.60 आर ही वादग्रस्त आहे.

 सुनील शिवाजी शिंदे यांनी मुद्दल व व्याज रक्कम बाळासाहेब कोरे व बजरंग बर्वे यांना देऊनही हा खरेदी दस्त परत करण्यास टाळाटाळ केली आहे.

 या संदर्भात सुनील शिंदे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख पोलीस निरीक्षक यांच्याकडे खाजगी सावकारांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात तक्रारीही केल्या आहेत व न्यायालयात ही दस्त नोंदवूनही जागा परत मिळवण्यासाठी दावा दाखल केलेला आहे असे असताना

 दि.15 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 03.00 वा. चे सुमारास बाळासो शंकर कोरे रा. आगलावेवाडी ता. सांगोला व बजरंग महादेव बर्वे रा. जवळा ता. सांगोला, बिटू गरंडे, अमोल बर्वे, बिरा बापु गरंडे, लिंगाप्पा मासाळ,

 सर्व रा. जवळा ता. सांगोला व इतर 05 ते 06 अनोळखी लोक हे जमीन गट नं 128/2/अ/11, क्षेत्र 8.60 आर येथे येवुन सुनिल शिवाजी शिंदे यांना तु हि जागा खाली कर नाही 

तर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणुन लागले तेवढ्यात बजरंग बर्वे यांनी सुनिल शिवाजी शिंदे यांना हाताने लाथांबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळी करुन दमदाटी केली व इतर आलेल्या लोकांनीही सुनिल शिवाजी शिंदे यांना 

शिवीगाळी दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी देवुन सुनिल शिवाजी शिंदे यांचे सुरज ट्रेडर्स या दुकानाचे सीसीटिव्ही कॅमेरा फोडुन नुकसान करुन दुकानात ठेवलेले दोन काऊंटर, लोंखडी कपाट, व कपाटात ठेवलेले दस्त, एल. आय. सी. पावत्या, बँक पासबुक,

  दुकानाची खरेदी-विक्री बिले व इतर कादगपत्रे तसेच सुरज ट्रेडर्स नावाचे दुकान व दुकानाचे आजुबाजुला बिल्डिंग मटेरियल विक्रीकरीता ठेवलेले, लोखंडी रैंक तसेच सिमेंटचे पोल, परसी, कडाप्पा, लाकडी चौकटी, सिमेंटचे दरवाजे

 व चौकटी, प्लबिंगच्या प्लास्टीकच्या पाईपा इत्यादी साहित्य व दुकानातील काऊंटर मधील डेल कंपनीचा लॉपटॉप, पेन्ड्राईव, 21500 रुपये रोख रक्कम इत्यादी साहित्य ट्रॅक्टर, टेम्पो, जेसीबीच्या साहाय्याने जबरदस्तीने घेवुन गेले आहेत.  01) बाळासो शंकर कोरे रा. आगलावेवाडी 

ता. सांगोला, 2) बजरंग महादेव बर्वे, 3) बिटु गरंडे, 4) अमोल बर्वे, 5) बिरा बापु गरंडे 6) लिंगाप्पा मासाळ सर्व रा. जवळा ता. सांगोला, जि सोलापुर यांचेसह व इतर 05 ते 06 अनोळखी

 लोकांविरूद्ध  सुनील शिवाजी शिंदे यांनी सांगोला पोलीसात तक्रार दिल्यानंतर  सांगोला पोलीस ठाणे दखलपात्र रजि. नंबर 159/2026 बी.एन.एस. कलम. 119(1), 115(2), 351(2), (3), 352, 324(4), 189(2),190,191(2), प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.  

या खाजगी सावकारांनी धुमाकूळ घातला आहे. अनेकांच्या जागा जमिनी खाजगी सावकारीतून बळकावल्या आहेत. याबाबत तक्रारीही दाखल झाल्या आहेत. राजकीय दबावाने या खाजगी सावकारांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

यापुर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी तक्रारी दाखल झाल्यावर बाळासाहेब कोरे व बजरंग बर्वे यांनी जवळ्यातील जमिनी परत खरेदी दस्त फिरवून देवून तक्रारी मिटविल्या आहेत.

 सुनिल शिंदे यांच्याकडे खाजगी सावकारांना मुद्दल व व्याजासहित पैसे परत केल्याचे पुरावे आहेत. सुनिल शिंदे यांनी या खाजगी सावकारांवर गुन्हे दाखल करावेत व माझी जागा परत मिळावी अशी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments