सांगोला तालुक्यातील एक एकरही जिरायत ठेवणार नाही: माजी आमदार शहाजीबापू पाटील



कडलास गटातील सर्वच गावातून या उमेदवारांना प्रचंड लीड देणार: कार्यकर्त्यांचा निर्धार

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

कडलास जिल्हा परिषद गटातील व गणातील वाटंबरे, अकोला, केदारवाडी, कडलास येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा संपन्न 

सांगोला/ प्रतिनिधी: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सांगोला तालुक्यात महायुती अस्तित्वात आली. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार सुरू आहेत. सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.

 तालुक्यातील विजेचा प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. माणनदी व कोरडा नदीला कॅनॉलचा दर्जा दिला आहे. भविष्यातही माण नदीचे पाणी हटू देणार नाही. तालुक्यातील एक एकरही क्षेत्र जिरायत ठेवणार नाही असे आश्वासन माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिले .

पुढे बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले,तालुक्यातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे तयार केले जातील. नगरपालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता आणली याची दखल घेत नगरविकासमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला शहराच्या विकासासाठी १५० कोटी रुपयांचा निधी दिला. ही माझी ताकद नसून शिवसेनेची ताकद आहे. 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सुरू असून ग्रामविकास खाते पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे आहे. शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले व मंत्री संजय शिरसाट यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. तालुक्यातील दोन्ही आमदारांच्या हातून

 गेल्या वर्षभरात एकही विकासाचे काम झालं नाही. परंतु मी आणलेल्या साडेपाच हजार कोटी रुपये निधीतून तालुक्याचा विकास आजही सुरू आहे असे विचार माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी युवकनेते योगेशदादा खटकाळे म्हणाले ,वाटंबरे, अकोला गावच्या विकासासाठी आम्ही कधीच कमी पडणार नाही. कडलास जिल्हा परिषद गटातील महायुतीचे उमेदवार शिवसेनेच्या शोभाताई खटकाळे व

 पंचायत समिती गणाच्या शिवसेनेच्या उमेदवार राणीताई पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करावे ‌. बापूंनी केलेल्या विकास कामाची पावती म्हणून दोन्ही उमेदवारांना विजयी करून विकास कामाची संधी द्यावी. 

वाटंबरे येथील सभेमध्ये भाजपच्या कार्यकारणी सदस्या राजश्रीताई नागणे पाटील, प्रतीक पवार ,मधुकर पवार, दत्तात्रय पवार ,विकास पवार यांनी मनोगत व्यक्त केले. अकोला येथील सभेमध्ये सुनील शिंदे, ॲड. महादेव कांबळे, प्रतीक पवार यांनी मनोगत व्यक्त केले. 

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेसाठी उमेदवार शोभाताई खटकाळे ,पंचायत समिती गणाच्या उमेदवार राणीताई पाटील, उपनगराध्यक्ष नितीन इंगवले , नगरसेविका राणीताई माने, भाजपचे ज्येष्ठनेते शिवाजीअण्णा गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य 

अशोकभाऊ शिंदे, सुभाष पवार नगरसेविका तनुजा एरंडे ,नगरसेवक माऊली तेली ,नगरसेवक अरूण पाटील, नगरसेवक प्रशांत धनवजीर, नगरसेवक काशिलिंग गावडे, तारका खटकाळे उद्योगपती बाळासाहेब आसबे 

,भागवत शिंदे,चेअरमन अनिल खटकाळे, राजलक्ष्मीताई पाटील, उद्योगपती बाळासाहेब झपके, युवानेते गुंडादादा खटकाळे, उपसरपंच महादेव शिंदे, समाधान खटकाळे आदी मान्यवर महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा वर्ग उपस्थित होते.


दुसरी बातमी वाचा व पहा..


तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा: माजी आम. शहाजीबापू पाटील




कडलास जिल्हा परिषद गटातील वझरे,चिणके,अजनाळे,य.मंगेवाडी, कमलापूर, गोडसेवाडी येथे महायुतीच्या उमेदवार शोभाताई खटकाळे व अजनाळे गणाच्या उमेदवार शितल भडंगे यांच्या प्रचारसभांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

सांगोला/ प्रतिनिधी: सांगोला नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक विजय मिळवला. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजूट करावी. सत्तेच्या बाजूने राहिल्यास विकास करणे सोपे होते. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.

यावेळी युवानेते योगेशदादा खटकाळे म्हणाले, कडलास जिल्हा परिषद गटाच्या महायुतीच्या शिवसेनेच्या उमेदवार शोभाताई खटकाळे व अजनाळे पंचायत समिती गणाच्या उमेदवार शितल भडंगे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून आम्हाला कडलास गटाच्या विकासाची संधी द्यावी. पाच वर्षात जनतेच्या विकास कामांमध्ये आम्ही कोठेही मागे राहणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त केला.

यावेळी वझरे येथे वसंत पाटील, बापू वाघमारे, महेश वाघमारे, यांनी मनोगत व्यक्त केले, तसेच चिणके येथे उद्योगपती बाळासाहेब काटकर, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, नगरसेविका राणीताई माने, यलमर मंगेवाडी येथे बाळकृष्ण येलपले, कमलापूर येथे पप्पू ऐवळे, अजनाळे येथे उपसरपंच बापुराव कोळवले यांनी आपल्या मनोगतात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या भविष्यकालीन विकास योजनांना पाठबळ देण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन केले. 

आजनाळे पंचायत समिती गणाच्या उमेदवार शितल भडंगे म्हणाल्या,विकास कामासाठी माझी उमेदवारी असून मला सेवा करण्याची संधी द्यावी.

 कडलास जिल्हा परिषद गटातील व अजनाळे गणातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नगरसेविका राणीताई माने, सरपंच बानू चव्हाण, नगरसेविका तनुजा एरंडे, नगरसेवक प्रशांत धनवजीर, नगरसेवक अरुण पाटील,नगरसेवक माऊली तेली, शिवसेनेचे युवानेते गुंडादादा खटकाळे, नगरसेवक काशिलिंग गावडे, उद्योगपती बाळासाहेब आसबे, उद्योगपती माजी नगराध्यक्ष मारुतीआबा बनकर, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, बहुजन नेते, बापूसाहेब ठोकळे,अध्यक्ष नितीनभाऊ रणदिवे उपस्थित होते .

यावेळी अनेक मान्यवरांनी सांगितले की, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या विकास कामावर जनतेचा पूर्णपणे विश्वास असून यांच्याकडून भविष्यात विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. शहाजीबापूंचे हात बळकट करण्यासाठी व त्यांना समर्थ साथ देण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना अजनाळे गणातील गावातून मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन महायुतीच्या कार्यकर्त्याकडून करण्यात आले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर व युवावर्ग , महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.