google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्व. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या जयंती निम्मित बुधवारी जवळा येथे समाधी दर्शन सोहळा

Breaking News

स्व. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या जयंती निम्मित बुधवारी जवळा येथे समाधी दर्शन सोहळा

स्व. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या जयंती निम्मित बुधवारी जवळा येथे समाधी दर्शन सोहळा


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : तालुका प्रतिनिधी सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दि १४ जानेवारी रोजी 

जवळा ता सांगोला येथे स्व काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी समाधी दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

सांगोला तालुक्यातील रस्ते, शेती, पाणी, आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधासाठी शेवटच्या श्वासापर्यंत स्व काकासाहेब साळुंखे पाटील यांनी स्वतःचे जीवन समर्पित केले होते. 

सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाणी प्रश्नाचा पाठपुरावा करतानाच त्यांनी जगाचा निरोप घेतला. सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण तालुक्यातील तरुण पिढीला व्हावी 

आणि त्यांच्या कार्यापासून तरुणांनी प्रेरणा घेऊन राजकारण आणि समाजकारणात सक्रीय व्हावे यासाठी जवळा ता सांगोला येथे स्व काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी समाधी दर्शन सोहळा आयोजित केला आहे 

बुधवार १४ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत नागरिकांनी स्व काकासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन साळुंखे पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments