google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक ..इन्कम टॅक्स विभागात मुलांना नोकरी लावतो म्हणून सांगोला तालुक्यातील व्यक्तीकडून १५ लाख रुपये उकळले

Breaking News

खळबळजनक ..इन्कम टॅक्स विभागात मुलांना नोकरी लावतो म्हणून सांगोला तालुक्यातील व्यक्तीकडून १५ लाख रुपये उकळले

खळबळजनक ..इन्कम टॅक्स विभागात मुलांना नोकरी लावतो म्हणून सांगोला तालुक्यातील व्यक्तीकडून १५ लाख रुपये उकळले


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :- इन्कम टॅक्स विभागात नोकरी लावतो, असे आमिष दाखवून १५ लाख रुपये उकळले. फसवणूक केल्याप्रकरणी भोपसेवाडी, जवळा येथील व्यक्तीने 

संतोष राचय्या स्वामी (रा. गाताडे प्लॉट, जुना कराड नाका मागे, पंढरपूर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची घटना घडली आहे.

श्रीमंत बापू वगरे (वय ५८, रा. भोपसेवाडी, जवळा, ता. सांगोला) यांनी दिलेल्या 

फिर्यादीनुसार, संतोष स्वामी याने ११ जानेवारी २०२१ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पंढरपूर येथे फिर्यादी बगरे यांना मी तुमच्या दोन्ही

 मुलांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये सोल्यातील बरिष्ठ अधिकारी व कर्मचारी नोकरी लावतो, त्यासाठी इन्कम टॅक्स यांना 

देण्यासाठी पैसे लागतात असे सांगुन फिर्यादीकडून स्वामी याने ११ जानेवारी रोजी ठरल्याप्रमाणे १५ लाख रुपये घेतले.

फसवणूक प्रकरणी पंढरपूर येथील एकावर गुन्हा दाखल

त्यानंतर आज अखेर फिर्यादीच्या मुलास नोकरी लावली नाही आणि पैसेही परत दिले नाहीत म्हणून श्रीमंत वगरे (रा. भोपसेवाडी, 

जवळा, ता. यांच्या फिर्यादीनुसार संतोष स्वामी (रा. पंढरपूर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक पाटील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments