खळबळजनक! तीन वर्षांच्या बाळासोबत झोपलेला असताना त्याची
'शी' ही कपड्याला लागल्याने बाळाचा गळा दाबून खून; सोलापूर जिल्ह्यातील घटना..
तीन वर्षांच्या फरहानसोबत झोपलेला असताना त्याची ‘शी’ ही कपड्याला लागल्याने फरहानचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना
११ डिसेंबर रोजी एमआयडीसी हद्दीतील कोंडानगर घडल्याचे सूत्राने सांगितले.
फरहानची आई शैनाज जाफर शेख (वय २८, रा. कल्पनानगर, कोंडानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा कथित प्रियकर मौलाली ऊर्फ अकबर अब्दुलरजाक मुल्ला
(वय ४४, रा. खादी ग्रामोद्योग रोड, विजयपूर, कर्नाटक) याच्यावर सोमवारी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
फिर्यादी शैनाज या मागील काही दिवसांपासून आरोपी अकबर याच्यासोबत सोलापुरात राहत होत्या. ते दोघे मूळ कर्नाटकातील आहेत. शैनाज या भांडे-धुणे करण्याचे काम करत होत्या;
तर आरोपी अकबर हा बिगारी म्हणून काम करत होता. त्याला दारूचे व्यसन होते. ११ डिसेंबर रोजी दुपारी शैनाज कामासाठी बाहेर गेल्या होत्या.
तेव्हा आरोपी अकबर हा फरहानच्या शेजारी झोपला होता. त्यावेळी घटना घडली. काही वेळानंतर शैनाज घरी आल्यानंतर फरहान खाली पडल्याचे अकबरने सांगितले. त्यानंतर फरहानला एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेले.
डॉक्टरांनी त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले; पण आरोपीने त्या सर्वाना कर्नाटकात नेले. तेथील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी विजापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला, तेथून हा गुन्हा सोलापुरात वर्ग झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातून ताब्यात घेऊन सोलापुरात अटक केली. या घटनेचा तपास सपोनि दादासाहेब मोरे करत आहेत.
आरोपी पळाला होता
आरोपीने फरहान व इतरांना विजयपूर येथे नेले. तेथून तो पळून गेला. यामुळे फिर्यादीने पतीला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात नेले जाणार आहे, अशी माहिती एमआयडीसीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिली.


0 Comments