google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Breaking News

सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- राज्यात काही दिवसांतच महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. 

महायुतीनेही मोठी तयारी केली आहे. पण, महायुतीमध्येही पक्षांत्तर सुरू असल्याचे दिसत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजपाला धक्का दिला आहे.

सोलापूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याआधी त्यांनी भाजपामध्ये काम केले आहे.

 भाजपाचे ते नेते होते. ते जिल्हा परिषदेमध्ये सदस्य होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या पक्षाची पकड मजबूत करण्याची तयारी करत आहे. 

काही दिवसांपूर्वी माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यामुळे मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला.

काही दिवसातच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. या निवडणुकांची तयारी जोरदार सुरू आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोलापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची पकड होती. राज्यातील नव्या राजकीय समिकरणामुळे काही नेत्यांनी पक्षांतर केल्याचे दिसत आहे.

Post a Comment

0 Comments