google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगरपरिषदेवर शिवसेनेचे माजी आ.शहाजीबापू पाटील यांची सत्ता

Breaking News

सांगोला नगरपरिषदेवर शिवसेनेचे माजी आ.शहाजीबापू पाटील यांची सत्ता

सांगोला नगरपरिषदेवर शिवसेनेचे माजी आ.शहाजीबापू पाटील यांची सत्ता


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला - राज्याचे लक्ष लागून असलेल्या सांगोला नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे

 माजी आ.शहाजीबापू पाटील यांना लोकनियुक्त नगराध्यक्षसह २३ पैकी १५ नगरसेवक निवडून आणण्यात यश आले आहे.

तसेच शहर विकास आघाडीला ८ जागांवर समाधान मानावे लागले.

सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेतकरी कामगार पक्षामधील मारुतीआबा बनकर

 यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेऊन त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. त्यानंतर दिपकआबा साळुंखे पाटील गट,

 शेतकरी कामगार पक्ष व भारतीय जनता पार्टी यांनी एकत्र येऊन शहर विकास आघाडी स्थापन केली. त्यांच्याविरुद्ध

 शिवसेनेचे माजी आ.शहाजीबापू पाटील यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आनंदा माने यांना देऊन एकाकी लढत दिली. 

निवडणुकीच्या काळात शहर विकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सांगोल्यात सभा पार पडल्या होत्या.

दरम्यान शिवसेनेकडून प्रभाग क्र.१ अ मधून राणी आनंदा माने तसेच शहर विकास आघाडी कडून प्रभाग क्र.११ अ मधून सुजाता चेतनसिंह केदार सावंत

 ह्या नगरसेवक पदासाठी बिनविरोध निवडून आल्या. त्यामुळे रविवार दि.२१ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष व २१ नगरसेवक पदासाठी मतमोजणी पार पडली.

 यामध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा गोरख माने हे ५ हजार १४० मतांनी विजयी झाले. तसेच 

नगरसेवक पदाचे प्रभाग क्र.१ ब रामचंद्र बापू मदने, प्रभाग क्र.२ अ प्रशांत बबन धनवजीर, २ ब वैशाली सतिश सावंत, प्रभाग क्र.३ अ गोदाबाई भारत बनसोडे, 

३ ब अरुण विलास पाटील, प्रभाग क्र.४ अ आशादेवी सोमेश्वर यावलकर, ४ ब ज्ञानेश्वर बाळकृष्ण तेली, प्रभाग क्र.५ अ काशिलिंग दगडू गावडे,

 ५ ब छाया सुर्यकांत मेटकरी, प्रभाग क्र.६ अ सिमा समाधान सरगर, ६ ब चैतन्य ज्ञानु राऊत,

 प्रभाग क्र.१० ब विवेक दिलीप पाटील, प्रभाग क्र.११ ब अनिता निलेश केदार, क नितिन विठ्ठल इंगोले हे उमेदवार विजयी झाले.

 तसेच शहर विकास आघाडीचे प्रभाग क्र.७ अ गणेश शिवाजी बनकर, ७ ब शोभा निवृत्ती फुले, प्रभाग क्र.८ अ श्रध्दा रवीप्रकाश साबळे, 

८ ब रमेश पांडूरंग जाधव, प्रभाग क्र.९ अ जुबेर इक्बाल मुजावर, ९ ब दिव्यानी सौरभ दौंडे, प्रभाग क्र.१० अ वैशाली सिध्दार्थ झपके हे उमेदवार विजयी झाले.

ही निवडणूक नेत्यांपेक्षा सर्वसामान्य जनतेने स्वतःच्या हातात घेतली होती. हा विजय सर्वसामान्य जनतेने प्रस्थापित, श्रीमंत आणि अहंकारी लोकांचा केलेला पराभव आहे.

 सांगोला शहरातील जनतेने आपला स्वाभिमान जिवंत ठेवला आहे. मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो.

- माजी आ.शहाजीबापू पाटील

सांगोला नगरपरिषदचे नूतन नगराध्यक्ष आनंदा माने आणि सर्व विजयी नगरसेवकांचे प्रथम मनपूर्वक अभिनंदन !

 या निवडणुकीत आमच्या शहर विकास आघाडीचा पराभव झाला. आघाडीचा हा पराभव धक्कादायक असला तरी या पराभवाने आम्ही कुणीही खचून जाणारे नाही. 

या पराभवाची कारणमीमांसा करू, तसेच जनमताचा आदर करून योग्य सर्व निर्णय घेऊ आणि आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जिंकण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करू

- माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील

Post a Comment

0 Comments