खळबळजनक..'पिकअपच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार'; वाकी (शिवणे) परिसरातील घटना, पिकअप अन् दुचाकीची समाेरासमाेर धडक
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : सांगोला तालुक्यातील वाकी (शिवणे) परिसरात पिकअप व दुचाकीचा भीषण अपघात होऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
ही घटना रविवारी (ता. २) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
हरिदास दामोदर जाधव (वय ५२, रा. वाकी-शिवणे, ता. सांगोला) हे आपल्या एमएच ४५ के ५४४७ या क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होते. महूद- सांगोला रोडवरील धाराशिव सहकारी साखर कारखान्याजवळ
समोरून येणाऱ्या पिकअपने (एमएच १३ डीक्यू १६०६) दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की हरिदास जाधव गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. या अपघातात त्यांच्या दुचाकीचेही अंदाजे १० ते २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या अपघातानंतर पिकअप चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पलायन केले असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत. फिर्याद सचिन बाळासाहेब जाधव (वय २८, रा. वाकी-शिवणे) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात दिली
असून, अनोळखी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेड कॉन्स्टेबल बोराटे तपास करीत आहेत.


0 Comments