भीषण अपघात..सांगोला-मिरज रस्त्यावर दुचाकीस चारचाकीची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : दुचाकीस चारचाकी वाहनाने समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी होऊन
उपचारापूर्वीच मृत पावल्याची घटना सांगोला-मिरज रोडवरील कमलापूर जवळील काळा ओळ्याजवळ जवळ घडली आहे.
सचिन जालिंदर पाटील (वय ३०, रा. खानजोडवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. सचिन पाटील हे मंगळवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास
सांगोला येथून आटपाडीकडे निघाले असताना समोरून अज्ञात चारचाकी वाहनाने चुकीच्या पद्धतीने येऊन धडक
दिल्याने अपघातातील दुचाकीस्वार सचिन पाटील यांचा गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद यांनी खबर दिली आहे. याबाबत पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली आहे.


0 Comments