google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात खरा बदल… भावनांवर नाही... विकासावर.. आणि त्या बदलाचं धैर्यवान नेतृत्व इंजि.मा. विश्वेशदादा झपके

Breaking News

सांगोला शहरात खरा बदल… भावनांवर नाही... विकासावर.. आणि त्या बदलाचं धैर्यवान नेतृत्व इंजि.मा. विश्वेशदादा झपके

सांगोला शहरात खरा बदल… भावनांवर नाही... विकासावर..


आणि त्या बदलाचं धैर्यवान नेतृत्व इंजि.मा. विश्वेशदादा झपके 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोल्यात आज राजकारणात एक विचित्र पण चांगलंच ओळखीचं दृश्य घडतंय. विरोधकांचे अनेक पक्ष एकाच वेळी एकत्र आलेत. कारण सांगोल्याचा विकास ? नाही.

 जनतेची प्रगती ? नाही. मूलभूत गरजांची पूर्तता ? अजिबात नाही. त्यांचं एकमेव ध्येय… स्वतःचं राजकीय अस्तित्व वाचवायचंय..

जेव्हा त्यांच्याकडे सत्ता होती, तेव्हा त्यांनी खरंच काम केलं असतं, तर आज सांगोल्याचे प्रश्न जैसे थे उभे राहिले नसते. पण त्यांनी शहरापेक्षा राजकारणाला महत्व दिलं…कामापेक्षा बॅनर..पाट्या लावायला वाहवा दिली…

 लोकांच्या प्रश्नांपेक्षा स्वतःच्या लोकांची काळजी केली. त्यामुळेच आजही सांगोला भोगतोय..पाण्याची टंचाई, खड्डेमय रस्ते, कचऱ्याचा त्रास, आरोग्यसेवेची मर्यादा, वाहतूक कोंडी, आणि नियोजनाचा पूर्ण अभाव.

विरोधकांकडे मुद्दे नाहीत… म्हणून भावनिक नाट्य…आज विरोधकांच्या हातात विकासाचा एकही ठोस मुद्दा नाही. शहरासाठी कोणतीही योजना नाही. भविष्याचा कोणताही रोडमॅप नाही. मग ते लोकांपुढे काय मांडतात ? 

फक्त भावनिक कार्ड. “मला अडवलं… माझ्यावर अन्याय… मला रोखलं जातंय…” भावनिक घोषणांनी शहर चालत नाही. भावनांवर नगरपालिकेचं भविष्य उभं राहत नाही.

लोकांच्या हक्काच्या सुविधांवर नाटकबाजीचा मुलामा चढवता येत नाही. सांगोला शहराचे खरे प्रश्न.ज्यांना खऱ्या नेतृत्वाची गरज ,पाण्याचा जुना पण जिवघेणा प्रश्न,सांगोला वर्षानुवर्षे पाण्यासाठी संघर्ष करतोय. 

कधी कमी दाब, कधी दिवसाआड पाणी. या प्रश्नाचा कायमस्वरूपी उपाय हवा.आणि त्याची स्पष्ट, तांत्रिक व दीर्घकालीन योजना विश्वेष झपके यांनीच पुढे आणली आहे. रस्ते खड्डेमय इतिहासाची पुनरावृत्ती शहरातील अनेक प्रमुख रस्ते दुरवस्थेत. 

बाजारपेठेतून वाहन चालवणं म्हणजे जणू परीक्षा. प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी सर्वांची धावपळ.याला जबाबदार कोण ?

 जी लोक वर्षानुवर्षे फक्त आश्वासने देत राहिली. विश्वेष झपके यांनी रस्ता विकासाची स्पष्ट आणि अमलात आणण्यासारखी रूपरेषा तयार केली आहे. 

स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन नावापुरती योजना नाले तुडुंब भरलेले, कचऱ्याचे ढिग, अनियमित उचल ही सांगोल्याच्या प्रतिमेला धक्का देणारी वस्तुस्थिती.

 विश्वेश झपके यांनी तांत्रिक कचरा व्यवस्थापन, विभाजन, उपचार केंद्र आणि नियमित स्वच्छता यंत्रणा यांची दिशा मांडली आहे.

आरोग्य सुविधा गरजेच्या वेळेस उपलब्ध नसणारी व्यवस्था आपत्कालीन वेळी सेवा मर्यादित, रुग्णवाहिका कमी,

 प्राथमिक सुविधा अपुऱ्या. कल्पना करा शहर वाढतंय, पण आरोग्यसेवा वाढत नाही. यावर उपाय म्हणून आरोग्यसेवा विस्ताराचं धोरण झपके यांच्या नियोजनात प्राधान्यस्थानी आहे.

 शिक्षण आधुनिकतेचा अभाव डिजिटल साधनांची कमतरता. खेळ, विज्ञान, 

तंत्रज्ञान या क्षेत्रात संधींचा अभाव. विश्वेश झपके शहराच्या शिक्षणाला आधुनिकता देण्याच्या ठोस योजना बाळगतात.

वाहतूक आणि शहर नियोजन दिशाहीन वाढ बाजारपेठ वाहतूक कोंडीनं भरलेली, पार्किंग व्यवस्थेचा अभाव, 

ड्रेनेज आणि रस्ता विस्तार यातील विसंगती हे सगळं नियोजनातील ढिसाळपणा दाखवतं.

यावर वैज्ञानिक शहर आराखडा, पार्किंग झोन, वाहतूक शिस्त आणि नियोजनबद्ध विकास ही झपके यांची दिशा आहे.

 विकास करणारा नेता एकच विश्वेश झपके आज सांगोल्यातील जनता एक गोष्ट ओळखते. 

शहरासाठी योजना करणाऱ्या, शहराला समजून घेणाऱ्या आणि उपाय शोधणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे.

 सुसज्ज ग्रंथालय, सर्व सोयींनी युक्त क्रीडा संकुल, पारदर्शकता,नैतिकता,चारित्र्यसंपन्नता,प्रामाणिकता,जनतेशी संवाद, विकासाची स्पष्ट 

दृष्टी,शहराबद्दलची संवेदनशीलता हे गुण कोणाकडे आहेत ? सांगोला आज एकच नाव घेतो.विश्वेष झपके.

भावनांनी शहर चालत नाही विकासच शहर उभं करतो. विरोधक एकत्र येत आहेत, पण त्यांचा आवाज विकासाचे पर्याय देत नाही. 

त्यांच्या भाषणांत भावनिक नाट्य आहे, पण प्रश्न सोडवण्याची क्षमता नाही. सांगोल्याला आज भावनांच्या गदारोळाची नाही, 

विकासाची, कामाची, दूरदृष्टीची गरज आहे. आणि या तिन्ही गोष्टी सांगोल्याला मिळू शकतात.

 विश्वेश झपके यांच्या नेतृत्वातूनच. सांगोल्याचा खरा बदल हवा असेल तर नेतृत्व एकच विश्वेष झपके.

विश्वेश झपके तुमच्याकडे विकासाचा रोड मॅप घेऊन आलेले आहेत. एक संधी अवश्य द्या.

Post a Comment

0 Comments