ब्रेकिंग न्यूज..सांगोला नगरपरिषद निवडणूकीचे अंतिम चित्र स्पष्ट; नगराध्यक्षपदासाठी 11 तर नगरसेवक पदासाठी 96 उमेदवार रिंगणात
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रक्रियेत निवडणूक नामनिर्देशनपत्र छाननी अंती अपील दाखल झालेले
प्रभाग क्र. 1 व प्रभाग क्र.11 च्या सदस्य पदासाठी नामनिर्देशन पत्र मागे घेणेची वाढीव मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी सैपन नदाफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्ज माघारीच्या मुदतीनंतर आता नगराध्यक्ष
पदासाठी 11 आणि नगरसेवक पदासाठी 96 उमेदवार असे एकूण 107 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत.
अर्ज माघारी घेतलेले उमेदवार पुढीलप्रमाणे
प्रभाग क्र. 1 अ
1) ऐश्वर्या मधुकर कुंभार
2) सुचिता दिलीप मस्के
3) शिंगाडे कोमल नवनाथ
प्रभाग क्र. 11 अ
1) मुजावर महेजबीन शकील
2) अजमुनिस्सा इब्राहिम मुल्ला
3) शोभा उदय घोंगडे
4) श्रद्धा किरण बुर्ले
प्रभाग क्र. 11 क
1) मुजावर शकील महमूद
2) मुलाणी गुलामेमुस्तफा शौकत
सांगोला शहरात नगराध्यक्ष पद आणि सदस्य पदासाठी आता अटीतटीची लढत होणार आहे.
नगराध्यक्ष पदासाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने सत्ताधारी गट, विरोधी पक्ष आणि अपक्ष उमेदवारांमध्ये तिरंगी किंवा चौरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणुकीचे अंतिम स्वरूप स्पष्ट झाल्यामुळे आता सर्वच पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रचाराला अधिक वेगाने सुरुवात केलेली आहे.


0 Comments