google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला बस स्थानकांवर लवकरच होणार मोफत 'वाचन कट्टा', जाणून घ्या कसा असेल

Breaking News

सांगोला बस स्थानकांवर लवकरच होणार मोफत 'वाचन कट्टा', जाणून घ्या कसा असेल

सांगोला बस स्थानकांवर लवकरच होणार मोफत 'वाचन कट्टा', जाणून घ्या कसा असेल


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यातील प्रमुख ७५ एसटी बसस्थानकांवर मोफत 'वाचनालय' 

सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.लवकर जिल्ह्यातील सांगोला, अकलूज आणि करमाळा बस स्थानकावर असा वाचनकट्टा सुरू होणार आहे.

ज्ञान, साहित्य आणि संस्कृतीचा दिवा जनतेसाठी प्रज्वलित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक आगळावेगळा, लोकाभिमुख आणि संस्कारमूल्ये जपणारा उपक्रम हाती घेतला आहे.

एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या ३०९ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयाची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी नुकतीच केली.

या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, तसेच उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.

यावेळी मंत्री सरनाईक म्हणाले, की विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आकाराला आला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्वसामान्य नागरिकांसाठी 'मोफत वाचनालय' उभारण्यात येणार आहे.

असा असेल वाचन कट्टा

सांगोला, अकलूज आणि करमाळा बस स्थानकावरील या फिरत्या या वाचनालयांमध्ये वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, नामदेव ढसाळ, व. पु. काळे, विश्वास पाटील अशा नामवंत साहित्यिकांच्या कृती उपलब्ध असतील.

तसेच एमपीएससी व यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मौल्यवान संदर्भग्रंथ ठेवण्यात येणार आहेत. हा 'वाचन कट्टा' मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपणारा ठरेल आणि समाजात वाचन संस्कृतीचा नवा सुवर्णप्रकाश पसरवेल, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरीनिमित्त आम्ही जनतेसाठी ज्ञानाची ही 'अनमोल भेट' देत आहोत. वाचन संस्कृती आणि मराठी साहित्याचा प्रचार हा आमचा लोकाभिमुख उपक्रम आहे.

- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

राज्यात ७५ बसस्थानकांवर मोफत वाचन कट्टा सुरू होत आहे. यासाठी आपण जिल्ह्यातील सांगोला, अकलूज आणि करमाळा या बस स्थानकांची नावे दिलेली आहेत. या ठिकाणी प्रशस्त बस स्थानके असून येथे या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.

-अमोल गोंजारी, विभाग नियंत्रक, सोलापूर

Post a Comment

0 Comments