google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील धक्कादायक बातमी! पत्नीचा साडीने गळा आवळून केला खून, स्वतःही गळफास घेऊन केली आत्महत्या; नेमके कारण काय?

Breaking News

सांगोला तालुक्यातील धक्कादायक बातमी! पत्नीचा साडीने गळा आवळून केला खून, स्वतःही गळफास घेऊन केली आत्महत्या; नेमके कारण काय?

सांगोला तालुक्यातील धक्कादायक बातमी! पत्नीचा साडीने गळा आवळून केला खून, स्वतःही गळफास घेऊन केली आत्महत्या; नेमके कारण काय?


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- पत्नीची हत्या अन् स्वतःलाही संपवले; सांगोल्यात ऊसतोड मजूराचे हादरवणारे कृत्य, लपून राहायचा

ऊस तोडणी कामगार पतीने पत्नीचा साडीने गळा आवळून खून केला आणि त्यानंतर

 ऊस तोडणी मुकादामाच्या त्रासाला कंटाळून स्वतः ही पत्र्याच्या खोलीत लोखंडी अँगलला स्टोलने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना गुरुवारी रात्री ९:३०च्या सुमारास कोळे ता. सांगोला येथील कोळे-बानुरगड रोडवरील हांडे वस्ती नजीक घडली.

समाधान बबन चव्हाण (वय ३०), अश्विनी समाधान चव्हाण (वय २५, रा.लोटेवाडी ता.सांगोला) असे मृत पती पत्नीचे नावे आहेत.

 याबाबत, दादा मोहिते (रा.जुनोनी ता.सांगोला) यांनी खबर दिली आहे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

गुरुवारी त्याने जुनोनी येथील मेव्हणे दादा मोहिते यांच्या मोबाइलवर फोन करून पत्नी अश्विनीस मी कोळे येथे येणार असून, माझे कपडे व जेवण घेऊन ये, असे म्हणाला.

 तो त्याचा मित्र अश्विनीसह तिघे जण मिळून दुचाकीवरून सायंकाळी ४:३०च्या सुमारास प्रमोद देशमख यांच्या शेतातील तवस्तीवर गेले असता,

अश्विनी हिस त्या ठिकाणी सोडले, तिने भाऊ दादा यास 'तू मला एक तासाने फोन कर,' असे म्हणाल्यानंतर ते दोघे जण दुचाकीवरून परत जुनोनी येथे परतले. 

त्यानंतर, दादाने रात्री ९:३० वाजता समाधान याच्या मोबाइलवर फोन केला असता बंद लागला, म्हणून दादा मोहिते व त्याची आई दुचाकीवरून या ठिकाणी गेले.

पत्र्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता, म्हणून त्यांनी जोराने ढकलला असता, समाधान खोलीतील पत्राच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसले, तर अश्विनी ही खोलीतील बेडवर मयत अवस्थेत पडल्याचे दिसून आल्याचे खबरीत म्हटले आहे.

घटनेची माहिती सांगोला पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांचे पंचनामे केले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कुंभार करीत आहेत

उचल घेतल्याने लपून-छपून राहत होता

मृत, समाधान चव्हाण याने दोन-तीन मुकादमाकडून ऊस तोडणीसाठी कामावर येतो म्हणून लाखो रुपयांची उचल घेतली होती,

 परंतु प्रत्यक्षात तो ऊसतोडणीसाठी न जाता मुकादामांची नजर चुकवून जुनोनी व कोळे परिसरात लपून-छपून राहत होता.(स्रोत लोकमत)

Post a Comment

0 Comments