आदर्शवत उपक्रम: मा. नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त 5 नोव्हेंबर रोजी
सांगोला येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन मोफत चष्मे वाटप आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी) : माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विचाराचे वारसदार व माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, बुधराणी हॉस्पिटल पुणे व सुपर आय केअर, दक्षता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर
रोजी सकाळी 10 ते सायं 4 वाजेपर्यंत सांगोला शहरातील वज्राबाद पेठ येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सामाजिक उपक्रम नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन राबविण्यात आला असून, पुण्यातील नामांकित रुग्णालये व वैद्यकीय तज्ज्ञांच्या सहकार्याने हे शिबिर पार पडणार आहे.
रुग्णांना अनेक वैद्यकीय विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार मिळणार असून विशेष म्हणजे मोफत चष्मे वाटप आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
डोळ्यांवरील शस्त्रक्रिया, मांस काढणे, रेटिना तपासणी, बुबुळ बद्दलणे, भिंगरोपन शस्त्रक्रिया व उपचार आदी नेत्रविषयक तज्ञ सेवाही उपलब्ध राहणार आहेत.
तसेच १ ते १५ वयोगटातील मुलांसाठी मोफत दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून, शहरातील पालकांनी मुलांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे सांगोला तालुका व परिसरातील नागरिकांना माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या दूरदृष्टीतून
मोफत व दर्जेदार वैद्यकीय सेवा एका ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भागातील व ज्येष्ठ नागरिकांसाठी हे शिबिर मोठी सोय ठरणार आहे,
या महाआरोग्य शिबिरात शिबिराप्रसंगी मेडिसिन विभाग, मूत्ररोग विभाग, बालरोग विभाग, अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी, हृदयरोग व कॅथ लॅब, अस्थिरोग विभाग, सर्जरी व गॅस्ट्रो इंटेरिलीजी विभाग,
डायलिसिस आदी तपासणी करून सल्ला देण्यात येणार आहे.यावेळी तज्ञ डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी व स्वयंसेवक उपस्थितीत राहणार आहे.
महा आरोग्य शिबिरास सांगोला शहरासह तालुक्यातील गरजू नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे
व नागरिकांनी आधार कार्ड सोबत आणण्याची विनंती सोमेश यावलकर मित्र परिवाकडून करण्यात आले आहे.
चौकट: आमचे नेते मा.आमदार अँड.शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुका
शहरातील गोरगरीब गरजू रुग्णांना आरोग्य सुविधा पोहोचाव्यात या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा
सोमेश यावलकर, मा.नगरसेवक


0 Comments