google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वत्सलादेवी देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जवळा विद्यालयाचा जिल्हास्तरीय कबड्डीमध्ये डंका 17 वर्षे वयोगटातील मुला-मुलींनी केला जिल्हा काबीज ; विभागीय स्तरासाठी निवड संस्थाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले कौतुक

Breaking News

वत्सलादेवी देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जवळा विद्यालयाचा जिल्हास्तरीय कबड्डीमध्ये डंका 17 वर्षे वयोगटातील मुला-मुलींनी केला जिल्हा काबीज ; विभागीय स्तरासाठी निवड संस्थाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले कौतुक

वत्सलादेवी देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जवळा विद्यालयाचा जिल्हास्तरीय कबड्डीमध्ये डंका


17 वर्षे वयोगटातील मुला-मुलींनी केला जिल्हा काबीज ; विभागीय स्तरासाठी निवड संस्थाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले कौतुक

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला ; तालुका प्रतिनिधी कै. सौ. वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै. अण्णासाहेब घुले-सरकार कनिष्ठ महाविद्यालय, जवळा (ता. सांगोला) या शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या विजयाची परंपरा कायम ठेवत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात “ जवळा विद्यालयाचा" झेंडा उंचावला आहे.

दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी 17 वर्षे वयोगटातील मुलींच्या कबड्डी संघाने आणि 31 ऑक्टोबर 2025 रोजी मुलांच्या कबड्डी संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत आपला दणदणीत विजय नोंदवत जिल्ह्यात 

प्रथम क्रमांक पटकावला. या दोन्ही संघांनी आपल्या झुंजार खेळ, संघभावना आणि अथक परिश्रमांच्या जोरावर विभागीय स्पर्धेसाठी निवड मिळवण्याचा मान मिळवला.

ही स्पर्धा अतिशय अतितटीची झाली होती, परंतु जवळा विद्यालयाच्या खेळाडूंनी आपल्या उत्तुंग जिद्द, चपळाई आणि खेळाडूवृत्तीच्या बळावर सर्व प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करत विजय मिळवला. 

मैदानावर मुला-मुलींचा उत्साह, शिस्त, आणि संघटित खेळ पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या खेळाने केवळ विजयच नव्हे तर “जवळा विद्यालय” या नावाला नवे तेज प्राप्त झाले आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री. विजय चडचणकर सर, श्री. अशोक पाटील सर, श्री. विजय लांडगे सर, तसेच मार्गदर्शक कोच 

श्री. पंकज गव्हाणे व सचिन चव्हाण यांचे विशेष कौतुक करण्यात आले. खेळाडूंना उत्तम मार्गदर्शन व प्रेरणा देऊन त्यांनी संघाला विजयाकडे नेले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब शिंदे सर, उपमुख्याध्यापक श्री. प्रशांत गोरे सर, संस्था सचिव श्री. सुभाष लऊळकर सर, कार्यालयीन सचिव श्री. मोहन कांबळे,

 संस्था उपाध्यक्ष श्री. मनाजीराव घुले सरकार आणि संस्थाध्यक्ष मा. आमदार  दिपकआबा साळुंखे पाटील यांनी या यशस्वी संघाचा सत्कार करून मनःपूर्वक अभिनंदन केले. विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

या सत्कार प्रसंगी मा.आमदार दिपकआबा साळुंखे  पाटील यांनी 

 “जवळा विद्यालयातील मुला-मुलींनी आपल्या मेहनतीने आणि संघभावनेने केवळ विजय मिळवला नाही तर आमच्या संस्थेचा आणि सांगोला तालुक्याचा गौरव वाढवला आहे.

 खेळ हे केवळ स्पर्धा नसून जीवनातील शिस्त, चिकाटी आणि संघर्ष शिकवणारे माध्यम आहे. या मुलांकडून प्रेरणा घेऊन इतर विद्यार्थ्यांनीही पुढे यावे, हीच अपेक्षा.” अशाप्रकारे आपले मत व्यक्त केले

ग्रामस्थांनीही या यशाचा आनंद साजरा करत खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव केला. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात या विजयाची चर्चा सुरू असून “वत्सलादेवी देसाई विद्यालय, जवळा” हे नाव आता कबड्डीच्या विश्वात तेजाने झळकत आहे.

या खेळाडूंच्या संघर्षातून उभा राहिलेला हा विजय हा केवळ जिल्हास्तरावरील यश नसून, ग्रामीण भागातील क्रीडाविकासाची सशक्त साक्ष आहे. आता या मुला-मुलींचे लक्ष विभागीय स्पर्धेकडे लागले आहे आणि संपूर्ण सांगोला तालुका त्यांच्याकडून आणखी एका विजयाच्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहे.

Post a Comment

0 Comments