ब्रेकिंग न्यूज..सांगोला-मिरज रोडवरील विठ्ठलवाडी येथे वारीला निघालेला वृद्ध दुचाकी धडकेत जागीच ठार
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : कार्तिक वारीला पंढरपूरला निघालेल्या पायी दिंडीतील वृद्ध वारकरी भाविकास दुचाकी स्वाराने समोरून जोराची धडक दिली. अपघातात त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.
हा अपघात सोमवारी सायंकाळी ५:३०च्या सुमारास सांगोला-मिरज रोडवरील विठ्ठलवाडी या ठिकाणी घडला.
शिवगोंडा भीमा खरोसे (वय ७५ रा. दंतवाड ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर)
असे मृत वारकरी भाविकांचे नाव आहे. दरम्यान, अपघातानंतर दिंडीतील वारकऱ्यांनी दुचाकीला अडविण्याचा प्रयत्न केला असता,
दुचाकीस्वाराने सांगोल्याच्या दिशेने धूम ठोकल्याचे दिंडीतील प्रत्यक्षदर्शी वारकऱ्यांनी सांगितले.
दंतवाड ता. शिरोळ येथून शुक्रवारी सकाळी ११च्या सुमारास माउली पायी दिंडीतील सुमारे १२५ वारकरी भाविक
कार्तिक वारीसाठी मिरजमार्गे पंढरपूर दिशेने निघाले होते. तीन दिवसांच्या प्रवासानंतर काल सोमवारी दुपारी दिंडीतील वारकऱ्यांनी नागज येथे जेवण केले. पुढील प्रवासासाठी सांगोल्याच्या दिशेने निघाले होते.
वाटेत शिवगोंडा खरोसे है दिंडीतून बाजूला गेले. परत येताना सांगोल्याकडून भरधाव येणाऱ्या अज्ञात दुचाकीने त्यांना समोरून जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला.


0 Comments