google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोल्हापूर –कलबुर्गी रेल्वेस एक वर्ष मुदतवाढ मिळावी:– अशोक कामटे संघटना

Breaking News

कोल्हापूर –कलबुर्गी रेल्वेस एक वर्ष मुदतवाढ मिळावी:– अशोक कामटे संघटना

कोल्हापूर –कलबुर्गी रेल्वेस एक वर्ष मुदतवाढ मिळावी:– अशोक कामटे संघटना 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी) रेल्वे  क्रमांक 01451& 01452 कोल्हापूर– कलबुर्गी– कोल्हापूर एक्सप्रेस रेल्वेस किमान 1 वर्ष मुदतवाढ देण्यात यावी 

या मागणीचे निवेदन शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने मा. खासदार धैर्यशील मोहिते– पाटील यांना देण्यात आले.

 ट्रेन क्रमांक 01451 & 01452 कोल्हापूर– कलबुर्गी– कोल्हापूर स्पेशल एक्सप्रेस ट्रेन सुरू असून त्याची मुदत 20 नोव्हेंबर पर्यंत असल्याने त्या गाडीस कोल्हापूर, सांगली, सोलापूर ,कलबुर्गी या  चारही 

जिल्ह्यातून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर सोय होत असल्याने सदरची रेल्वे सेवा सुरू ठेवून या रेल्वेस

 किमान एक वर्ष मुदतवाढ किंवा कायमस्वरूपी ही रेल्वे सोडण्यात यावी, 01477 & 01478 सोलापूर –अनाकापल्ली या रेल्वेचा विस्तार मिरज स्थानकापर्यंत करण्यात यावा, 

11027& 11028दादर –सातारा –दादर एक्सप्रेस रेल्वे दररोज सोडावी,सांगोला–पुणे–सांगोला एक्सप्रेस रेल्वे दररोज सुरू करावी, 

कोल्हापूर– नागपूर एक्सप्रेस दररोज सोडावी,सांगोला स्टेशनवर कोच इंडिकेटर सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी

 या मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. तरी या कोल्हापूर – कलबुर्गी ज्यादा रेल्वेस कायमस्वरूपी करावी व या रेल्वेस

 ‘देवदर्शन ‘एक्सप्रेस नाव देण्यात यावे,  अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनाच्या प्रती महाप्रबंधकसो 

मध्य रेल्वे ,मुंबई, 

खासदार प्रणितीताई शिंदे ,

खासदार धनंजय महाडिक,

 खासदार विशाल पाटील , खासदार छत्रपती शाहू महाराज,

भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार– सावंत ,विभागीय रेल्वे व्यवस्थापक ,सोलापूर, पुणे . यांनाही देण्यात आले आहेत. यावेळी शहीद अशोक कामटे संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

चौकट:–

(१)अशोक कामटे सामाजिक संघटनेने केलेल्या मागणीप्रमाणे 

कोल्हापूर –कलबुर्गी –कोल्हापूर रेल्वे नियमित सुरू राहण्याकरिता रेल्वे विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे इतरही नवीन रेल्वे बाबतीत विभागाकडून लवकरच सकारात्मक निर्णय होईल.

खासदार धैर्यशील मोहिते–पाटील 

(2) चौकट 

दादर –सातारा –दादर एक्सप्रेस, कोल्हापूर –कलबुर्गी रेल्वे प्रवाशांकरिता फायदेशीर असून 

संघटनेने सुरुवातीपासूनच सर्वांना सोईस्कर गाड्या कायमस्वरूपी धावण्याकरिता रेल्वे प्रशासन, सर्व विभागाचे खासदार यांच्या मार्फत पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू आहे त्यास यश मिळेल .

निलकंठ शिंदे सर, अध्यक्ष अशोक कामटे संघटना, सांगोला

Post a Comment

0 Comments