google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलीस निरीक्षक घुगे यांनी माणनदी काठावर धुव्वाधार पावसात केली वृक्ष लागवड

Breaking News

सांगोला पोलीस निरीक्षक घुगे यांनी माणनदी काठावर धुव्वाधार पावसात केली वृक्ष लागवड

सांगोला पोलीस निरीक्षक घुगे यांनी माणनदी काठावर धुव्वाधार पावसात केली वृक्ष लागवड


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला - सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी वाडेगाव, ता.सांगोला येथे माणनदी काठावर धुव्वाधार पडणाऱ्या पावसात वृक्ष लागवड करून येथील ग्रामस्थांना एक चांगला संदेश दिला.

वाडेगाव या गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत माणगंगा नदी काठावर वृक्ष लागवडीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थासह पो.नि.विनोद घुगे वृक्ष लागवडीच्या स्थळावर पोहोचले.

वृक्ष लागवडीला सुरुवात करणार इतक्यात धुव्वाधार पावसाला सुरुवात झाली, परंतु पो.नि.विनोद घुगे यांनी कसलीही गडबड न करता पावसामध्ये भिजत शांतपणे वृक्ष लागवड करून त्याच ठिकाणी थांबले. यानिमित्त वृक्ष लागवडीतून ग्रामस्थांना एक वेगळा शुभ संदेश दिला.

यावेळी सुरेश डोईफोडे, शिवाजी दिघे, दत्ता शिनगारे, सागर ऐवळे, वसंत दिघे, वैजीनाथ घोंगडे, बंडू पाटील, प्रा.अजित दिघे, दादासो दिघे, बंडू हजारे, नारायण दिघे, आनंद दिघे, शिवाजी सूर्यगंध, दत्ता माने, संभाजी इंगोले, संजय दिघे, बाळासो हजारे व ग्रामस्थ उपस्थित होते.

पावसामध्ये वृक्ष लागवड करणाऱ्या व पर्यावरणविषयी श्रद्धा असणाऱ्या पो.नि.विनोद घुगे यांना ग्रामस्थातर्फे धन्यवाद देण्यात आले.

Post a Comment

0 Comments