google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ..आंधळगाव- गुंजेगाव रस्त्यावर पिकपच्या धडकेत दुचाकीवरील एकुलत्या एक मुलासह मजुराचा मृत्यू

Breaking News

धक्कादायक ..आंधळगाव- गुंजेगाव रस्त्यावर पिकपच्या धडकेत दुचाकीवरील एकुलत्या एक मुलासह मजुराचा मृत्यू

धक्कादायक ..आंधळगाव- गुंजेगाव रस्त्यावर पिकपच्या धडकेत दुचाकीवरील एकुलत्या एक मुलासह मजुराचा मृत्यू


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

फिल्टर चे शुद्ध पाणी आणण्यासाठी दुचाकीवरून गावाकडे जाण्यासाठी निघालेल्या दोघाला आठवडा बाजारासाठी जाणाऱ्या पिक अपने जोराची धडक दिल्याने दुचाकी वरील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सदरची घटना आंधळगाव- गुंजेगाव रस्त्यावर आज सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार विकास पाटील यांचा एकुलता एक मुलगा विघ्नेश पाटील वय 22 हा पुणे येथे संगणक अभियंत्याच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असून दिवाळी सुट्टीच्या निमित्ताने तो गावी आला.

 त्याच परिसरात इकबाल मुलांनी वय 50 हा मजूर म्हणून कामाला होता हे दोघे दुचाकी क्रमांक एम.एच.45 ए.आर.1463 वरून गुंजेगाव गावात येथे येत होते. इकबाल मुलाणी हा गावात राहावयास

 असून त्याला गावात सोडून जाताना शुद्ध पाणी घेऊन घराकडे जाण्यासाठी आलेला विघ्नेश ला तावशी येथील चार चाकी पिकअप क्रमांक एम एच 13 ई पी 1081 हा आंधळगाव येथे आठवडा बाजारासाठी जात होता.

पावसामुळे त्याला जाण्यास उशीर झाल्यामुळे तो भरधाव वेगाने जात होता. धडक इतकी जोरात होती त्यामध्ये पिकअप देखील रस्त्याच्या कडेला पलटी झाला. 

पिकप मधील जखमींना पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.दुचाकीला जोरात दिलेल्या धडकेत विघ्नेश पाटील आणि इकबाल मुलाणी हे गंभीर जखमी झाले 

त्यांना उपचारासाठी सांगोला येथे दाखल करण्यात आले.परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करून रात्री उशिरा गुंजेगाव अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत विघ्नेश हा विकास पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याने शिकून चांगल्या पदावर काम करावे अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती 

त्या दृष्टीने त्याला संगणक अभियंताच्या शिक्षणासाठी पुणे येथे पाठवण्यात आले होते दिवाळी सुट्टीवर येऊन आज झालेल्या अपघातात त्याच्या जाण्याने पाटील यांच्या कुटुंबावर दुःखाचा शोककळा पसरली.

Post a Comment

0 Comments