google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..महूद गटातून दादासाहेब लवटे शिवसेना-महायुतीचे उमेदवार ठरण्याची दाट शक्यता; संघटनशिल, जनसंपर्कात अग्रस्थानी असलेला लोकप्रिय नेता रिंगणात उतरणार..!

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..महूद गटातून दादासाहेब लवटे शिवसेना-महायुतीचे उमेदवार ठरण्याची दाट शक्यता; संघटनशिल, जनसंपर्कात अग्रस्थानी असलेला लोकप्रिय नेता रिंगणात उतरणार..!

ब्रेकिंग न्यूज..महूद गटातून दादासाहेब लवटे शिवसेना-महायुतीचे उमेदवार ठरण्याची दाट शक्यता;


संघटनशिल, जनसंपर्कात अग्रस्थानी असलेला लोकप्रिय नेता रिंगणात उतरणार..!

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

  सांगोला तालुक्यातील महूद जिल्हा परिषद गटातून शिवसेना (महा-युती) कडून दादासाहेब भगवान लवटे यांची उमेदवारी 

जवळ-जवळ निश्चित होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या ते एकनाथ शिंदे गट व दमदार पाणीदार 

मा.आमदार शाहजी (बापू) पाटील यांच्या शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत असून, गेल्या

 काही वर्षांत त्यांनी पक्षाची मजबुत संघटन बांधणी, शाखा विस्तार आणि जनसंपर्क यामध्ये प्रभावी भूमिका बजावली आहे.

दादासाहेब लवटे हे शिंदे शिवसेनेतील मा.आमदार शाहजी (बापू) पाटील यांचे खंदे समर्थक विश्वासू नेतृत्व असून 

अत्यंत सक्रिय लोकनेता असलेले आणि सर्वसामान्य जनतेतील लोकप्रिय नेते मानले जातात.

त्यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेना पक्षाने महूद गटासह तालुकाभरात मजबूत पकड निर्माण केली आहे.

त्यांच्या पत्नी सौ.रुपाली दादासाहेब लवटे या पूर्वी चीक महूद गणातून निवडून आल्या होत्या. त्यांनी 2016 ते 2019 या काळात महूद गटातील 14 गावांना पाणी मिळावे 

यासाठी अनेक आंदोलने करून उजनी उपसा सिंचन योजना मंजूर करून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.महूद गटामध्ये सुमारे 38 हजार मतदार असून त्यापैकी

 महूद पंचायत समिती गणात सुमारे 18 हजार मतदार, तर चीक महूद गणात 20 हजार मतदार आहेत.

 या गटात इटकी, कटफळ, लोटेवाडी, सातारकर वस्ती, चीक महूद, बंडगरवाडी (1-2), महूद ढाळेवाडी, 

महिम कारंडेवाडी, खिलारवाडी अशी महत्त्वाची गावे येतात. दादासाहेब लवटे यांनी पक्षाचे 

नेते आ.शहाजी बापू पाटील यांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांची जनतेसमोर मांडणी करत पक्षाचा आवाज बुलंद ठेवला आहे.

 सामाजिक कार्य, दहीहंडी महोत्सव, गोरगरिबांसाठी केलेली सेवा आणि तळागाळातील संपर्क यामुळे ते आज शिवसेनेचे विश्वसनीय आणि जनतेच्या मनात घर केलेले नेतृत्व ठरले आहेत.

ओबीसी  सर्वसाधारण आरक्षण  जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळीवर शंभर टक्के शिवसेना पाठींबा मिळत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

त्यामुळे या निवडणुकीत दादासाहेब लवटे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments