google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 निधन वार्ता..मंगल बिले यांचे निधन

Breaking News

निधन वार्ता..मंगल बिले यांचे निधन

निधन वार्ता..मंगल बिले यांचे निधन


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला/प्रतिनिधीः सांगोला शहरातील बिलेवाडी येथील मंगल मुरलीधर बिले यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. 

मृत्यूसमयी त्यांचे वय 70 वर्षे होते. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

 सांगोला नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अरूण बिले यांच्या त्या मातोश्री होत्या.

मंगल बिले या मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे सांगोला शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्यावर बिलेवाडी येथील शेतात सोमवारी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या तिसर्‍या दिवसाचा

 विधी बुधवार 22 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता बिलेवाडी येथील शेतात होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments