यावर्षी मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही: माजी आम.ॲड. शहाजी बापू पाटील
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- यावर्षी मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही: माजी आम.ॲड. शहाजी बापू पाटील.
वाढदिवसाच्या निमित्ताने अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना सढळ हाताने मदत करण्याचे शहाजीबापू पाटील यांचे आवाहन
सांगोला /प्रतिनिधी: सोलापूर जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचा विचार करून वाढदिवसावर खर्च करण्यापेक्षा नुकसानग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने
सांगोला तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार ॲड. शहाजी बापू पाटील यांनी आपला 14 ऑक्टोबर रोजी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे जाहीर केले आहे. वाढदिवसा दिवशी सांगोला तालुक्यात उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
नुकसानग्रस्तांसाठी सढळ हाताने मदत करावी. माझ्यावर प्रेम करणाऱे नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मित्रपरिवार यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त कोणतेही बॅनर, कट आउट लावू नयेत
व हार तुरे सत्कार साहित्य आणू नये. वाढदिवसासाठी होणारा खर्च हा तालुक्यातील व जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना मदत म्हणून देण्याचे आवाहन माजी आम. शहाजीबापू पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यात व तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. एक सहानुभूती व मदत करण्याच्या उद्देशाने वाढदिवसा वरती खर्च
करण्यापेक्षा नुकसानग्रस्तांना आपण सर्वजण मदत करूया असे आवाहन माजी आम. शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक यांना केले आहे.


0 Comments