google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! दिव्यांग मुलाचे हाल बघवेना; आईची मुलासह विहिरीत उडी मारुन केली आत्महत्या; मंगळवेढा तालुक्यातील या घटनेने संपूर्ण परिसर हळहळला

Breaking News

धक्कादायक! दिव्यांग मुलाचे हाल बघवेना; आईची मुलासह विहिरीत उडी मारुन केली आत्महत्या; मंगळवेढा तालुक्यातील या घटनेने संपूर्ण परिसर हळहळला

धक्कादायक! दिव्यांग मुलाचे हाल बघवेना; आईची मुलासह विहिरीत उडी मारुन केली आत्महत्या;


मंगळवेढा तालुक्यातील या घटनेने संपूर्ण परिसर हळहळला 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

जन्मानेच दिव्यांग मुलाचे हाल बघवत नसल्याने व मानसिक तणावात येत आईने मुलासह शेतातील विहिरीत उडी घेत आतम्हत्या केल्याची घटना तालुक्यातील हुलजंती येथे बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.

अंबिका इराप्पा माळी (३३) व मुलगा विशाल इराप्पा माळी (९) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी मृत महिलेचा दीर जकराया दऱ्यापा माळी (३७, रा. हुलजंती) यांनी फिर्याद दिली.

हुलजंती येथे एका 33 वर्षीय विवाहितेस एक अपंग मुलगा व दोन मुली असल्याने मानसिक तणावाखाली जावून त्या विवाहितेने 9 वर्षीय अपंग मुलासह विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेची मंगळवेढा पोलीसात नोंद झाली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील खबर देणारे जकराया माळी (रा.हुलजंती) यांची भावजय तथा मयत अंबिका इराप्पा माळी (वय 33) हिस जन्मत:च मुलगा विशाल इराप्पा माळी (वय 9 वर्षे) हा अपंग होता.

तसेच या विवाहितेस एकूण दोन मुली होत्या. यामुळे सदर विवाहिता ही सतत मानसिक तणावाखाली होती. दि.8 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता हुलजंती परिसरातील एका विहिरीत आईने मुलासह पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली.

उमाशंकर कनशेट्टी यांनी या घटनेबाबत खबर देणारे जकराया माळी यांना कॉल करुन या घटनेची माहिती दिली.

सदर विवाहितेस अपंग मुलगा असल्याने त्याचे हाल तिला पाहवत नसल्याने तसेच दोन मुली झाल्याने तिने तणावाखाली येवून आत्महत्या केली असावी असा कयास आहे. सदर घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments