google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये “बेटी बचाओ बेटी पढाओ” कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

Breaking News

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये “बेटी बचाओ बेटी पढाओ” कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये “बेटी बचाओ बेटी पढाओ” कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला / प्रतिनिधी - सोमवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी "सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला" संचलित डॉ.गणपतराव देशमुख

महाविद्यालय सांगोला मध्ये “जेंडर सेन्सिटायझेशन” कमिटी अंतर्गत “बेटी बचाओ बेटी पढाओ” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मराठी विषयाच्या प्राध्यापिका 

सौ.इंदिरा येडगे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संगणक विभागाचे प्रा.डी.एस. कोळवले यांनी अध्यक्षपद स्विकारले.

 प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्राध्यापिका सौ. पाटील एल.आर व अध्यक्षांचा सत्कार प्राध्यापिका सौ. कोकरे टी .जे यांनी केला.या व्याख्यानाच्या वेळी कॉलेजमधील मुले व मुली उपस्थित होते. 

          या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्यांनी आजच्या काळातील बेटी बचाओ बेटी पढाओ, या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या मुलगी वाचली ,वाढली

 तर माणूस घडेल, जुन्या काळात वंशाला दिवा हवा म्हणून मुलगी वाढू द्यायचे नाहीत पण आता अनेक गावामध्ये मुंलांची संख्या जास्त आहे आणि त्यांचे लग्न होत नाहीत अशी सद्य परिस्थिती निर्माण झाली याला कारणीभूत आपणच आहोत,

 मुलगा मुलगी एक समान हा विचार मनात रुजावावा आणि तो विचार पुढे न्यावा असे त्यांनी सांगितले. मुलींमध्ये आणि मुलांमध्ये फरक न करता दोघांनाही समान दर्जाचे शिक्षण व राहणीमान मिळालेच पाहिजे तसेच मुलींसाठी स्वरक्षणासाठी त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. 

         या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिकेत (भैया) देशमुख ,संस्थेचे सचिव मा. विठ्ठलराव शिंदे सर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुलाणी सर व संगणक विभाग प्रमुख प्रा.श्री कोळवले सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमिटीच्या चेअरमन प्रा.सौ. सूर्यवंशी ए.पी यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. कु.गोडसे डी.एन यांनी केले. तसेच या कार्यक्रमासाठी संगणक विभागातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments